Headlines

🛑 Central Railway : मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी महत्वाची घोषणा, दिवाळी आणि छठसाठी…

🛑 Central Railway : मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी महत्वाची घोषणा, दिवाळी आणि छठसाठी... 🛑 Central Railway : मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी महत्वाची घोषणा, दिवाळी आणि छठसाठी...

हॅलो जनता न्यूज, मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने यावर्षी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव हंगामात अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या सप्टेंबर अखेरपासून नोव्हेंबर अखेरपर्यंत विविध मार्गांवर धावणार असून एकूण शेकडो सेवा उपलब्ध होतील.(Central Railway)

📌 Central Railway : विशेष गाड्यांचे तपशील:

१) मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गोरखपूर – मुंबई (१३२ सेवा)

गाडी क्र. 01079 : २६ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान दररोज रात्री २२.३० वाजता मुंबईहून सुटणार.

गाडी क्र. 01080 : २८ सप्टेंबर ते २ डिसेंबर दररोज दुपारी १४.३० वाजता गोरखपूरहून सुटणार.

महत्वाचे थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, झांसी, कानपूर, लखनऊ आदी.

२) पुणे – गोरखपूर – पुणे (१३० सेवा)

गाडी क्र. 01415 : २७ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर दररोज सकाळी ०६.५० वाजता पुणेहून सुटणार.

गाडी क्र. 01416 : २८ सप्टेंबर ते १ डिसेंबर दररोज सायंकाळी १७.३० वाजता गोरखपूरहून सुटणार.

३) नागपूर – पुणे – नागपूर साप्ताहिक विशेष (२० सेवा)

गाडी क्र. 01209 : २७ सप्टेंबर ते २९ नोव्हेंबर दर शनिवारी नागपूरहून १९.४० वाजता सुटणार.

गाडी क्र. 01210 : २८ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर दर रविवारी पुण्याहून १५.५० वाजता सुटणार.

४) लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) – दानापूर – लोकमान्य टिळक टर्मिनस (१३४ सेवा)

गाडी क्र. 01143 : २५ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर दररोज सकाळी १०.३० वाजता मुंबईहून सुटणार.

गाडी क्र. 01144 : २६ सप्टेंबर ते १ डिसेंबर दररोज रात्री २१.३० वाजता दानापूरहून सुटणार.

५) लोकमान्य टिळक टर्मिनस – नागपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक सुपरफास्ट विशेष (२० सेवा)

गाडी क्र. 02139 : २५ सप्टेंबर ते २७ नोव्हेंबर दर गुरुवारी पहाटे ००.२५ वाजता मुंबईहून सुटणार.

गाडी क्र. 02140 : २६ सप्टेंबर ते २८ नोव्हेंबर दर शुक्रवारी दुपारी १३.३० वाजता नागपूरहून सुटणार.

६) पुणे – दानापूर – पुणे विशेष (१३४ सेवा)

गाडी क्र. 01449 : २५ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर दररोज दुपारी १५.३० वाजता पुणेहून सुटणार.

गाडी क्र. 01450 : २७ सप्टेंबर ते २ डिसेंबर दररोज सकाळी ०५.३० वाजता दानापूरहून सुटणार.

🚉 Central Railway: थांबे आणि सोयी

या विशेष गाड्यांचे थांबे मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ, मनमाड, इटारसी, जबलपूर, कानपूर, लखनऊ, गोरखपूर, दानापूर आदी प्रमुख ठिकाणी असतील. प्रत्येक गाडीमध्ये वातानुकूलित तृतीय, शयनयान, सामान्य द्वितीय डबे तसेच गार्ड ब्रेक व्हॅनची सुविधा असेल. (Central Railway)

🛑 Central Railway : मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी महत्वाची घोषणा, दिवाळी आणि छठसाठी...
🛑 Central Railway : मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी महत्वाची घोषणा, दिवाळी आणि छठसाठी…

 🗓️ Central Railway : आरक्षणाची सुरुवात:

८ सप्टेंबर २०२५ पासून: गाडी क्र. 01079, 01415, 01209, 01210

९ सप्टेंबर २०२५ पासून: गाडी क्र. 01143, 02139, 02140, 01449

आरक्षण सर्व संगणकीकृत केंद्रांवर तसेच www.irctc.co.in वर उपलब्ध होईल. तसेच प्रवाशांना संपूर्ण वेळापत्रक आणि थांबे पाहण्यासाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES अ‍ॅप डाउनलोड करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

🛑 Shetkari Yojana २०२५ : रब्बी हंगामाच्या या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सुरू…

🛑 🌧️ महाराष्ट्रात १७ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, प्रशासन सतर्क, या जिल्ह्यांना इशारा…

🛑 एसीबीची कारवाई, पाचोऱ्यातील सहाय्यक महसूल अधिकारी लाच स्वीकारताना रंगेहात अटक

1,206Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION