हॅलो जनता न्यूज, जळगाव, दि. ९ सप्टेंबर २०२५ – जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या बोकड व बकरी चोरीच्या गुन्ह्यातील तिघा आरोपींना अटक करून मोठे यश मिळविले आहे. या आरोपींनी केवळ शनिपेठ परिसरातच नव्हे तर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनही बकरी चोरी केल्याची कबुली दिली आहे.
फिर्यादी सैय्यद परवेज सैय्यद आसिफ (वय २६, रा. दत्त मंदिर जवळ, शनिपेठ) यांनी दि. २७ ऑगस्ट रोजी फिर्याद दिली होती. त्यात त्यांनी सांगितले की, अज्ञात चोरट्यांनी त्यांचा ₹७,००० किंमतीचा बोकड व आवेश शेख यांची ₹६,००० किंमतीची बकरी चोरून नेली. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस गु.र.नं. २१६/२०२५ भा.दं.सं. कलम ३७९ (चोरी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे शाखेचा तपास व छापेमारी
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल व त्यांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. छापेमारीदरम्यान संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. यात गणेश वासुदेव जाधव (वय २०, रा. चिचोली, ता. जि. जळगाव) गणेश अशोक पाटील (वय २१, रा. चिचोली, ता. जि. जळगाव) अक्षय विजय वंजारी (वय २३, रा. चिचोली, ता. जि. जळगाव) या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केले आहे.

सदर आरोपींनी केवळ शनिपेठ प्रकरणातच नव्हे, तर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून देखील ३ बकऱ्या चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपींना शनिपेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास शनिपेठ पोलीस ठाणे करत आहे.
ही कारवाई पोउपनि. शरद बागल यांच्या नेतृत्वाखाली सफौ/अतुल वंजारी, पोहेकॉ/प्रविण भालेराव, पोहेकॉ/मुरलीधर धनगर, पोहेकॉ/विजय पाटील, पोहेकॉ/अक्रम शेख, पोहेकॉ/नितीन बाविस्कर, पोना/रतनहरी गिते, किशोर पाटील, पोहेकॉ/सिद्धेश्वर डापकर, पोहेकॉ/प्रदीप चवरे, पोना/रविंद्र कापडणे (सर्व स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या…
🛑 Central Railway : मध्य रेल्वेकडून प्रवाशांसाठी महत्वाची घोषणा, दिवाळी आणि छठसाठी…
🛑 Shetkari Yojana २०२५ : रब्बी हंगामाच्या या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सुरू…
🛑 🌧️ महाराष्ट्रात १७ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, प्रशासन सतर्क, या जिल्ह्यांना इशारा…
