हॅलो राजकारण

Loksabha Election : मुंबईतील ३७ मशिदींमधून उबाठामार्फत निवडणुकीचे फतवे,शिवसेना सचिव किरण पावसकर यांचा गंभीर आरोप

हॅलो जनता (मुंबई) नरेंद्र मोदींना पंतप्रधान न होण्यासाठी मुंबईत पोस्टर्स लावून समाजात तेढ निर्माण करण्यात येत आहे. मुंबईतील ३७ मशिदींनी फतवे जारी केले असून निवडणुकीत सहकार्यासाठी मुसलमानांवर दबाव टाकणे, बॅनर्स आणि पोस्टर्स लावणे, प्रचारासाठी मुल्ला मौलवींचा वापर करण्याचा गंभीर आरोप शिवसेना सचिव आणि प्रवक्ते किरण पावसकर यांनी उबाठावर केला. जातीय तेढ निर्माण करणाऱ्या संस्थे विरोधात शिवसेनेकडून जे. जे. मार्ग पोलिस ठाण्यात एफ.आय.आर दाखल करण्यात आला आहे.

गेले वर्षभरापासून संजय राऊत म्हणायचे की, निवडणुकीपूर्वी दंगली घडतील ते असे का बोलत होते? उबाठाच्या उमेदवाराच्या प्रचारात पाकिस्तानचा झेंडा, बॉम्बस्फोटातील आरोपी होते, त्यावर पोलीसांनी कारवाई करायला हवी. या सर्वांचे सूत्रधार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे असून त्यांना परदेशातून पैसा आला का याची चौकशी व्हावी, अशी मागणी पावसकर यांनी केली. संजय राऊत विरोधात केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली असल्याचे पावसकर म्हणाले.

दक्षिण मुंबईतील शिवसेनेचे मुंबादेवी संघटक रुपेश पाटील यांनी साबू सिद्धिक हॉस्पिटल, इमाम वाडा रोड, डोंगरी येथे पब्लिक कंप्लेंट सेंटर यांनी लावलेल्या आक्षेपार्ह पोस्टरबाबत पोलीसांत तक्रार दाखल केली आहे. या पोस्टर्समधून मशिद तोडले जात आहेत, दर्गे बंद केले जात असल्याचा मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे. मात्र मशिद तोडले नाहीत, मदरसा बंद केले नाही तर मग असे बोर्ड का? ज्या गोष्टी घडल्याच नाही त्याचा बोर्ड लिहणे आणि उबाठाला सपोर्ट करणे यामागे एक षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप किरण पावसकर यांनी केला. जामनगर हलाल मेमन जमात या संस्थेने उबाठाला सहकार्य करण्याचे पत्रक काढले आहे असे पावसकर म्हणाले.

 

Loksabha Election : खुर्चीसाठी उबाठाने हेकेखोरपणा केला, आमदार संजय शिरसाट याची टीका

राज्यात एकत्र सरकार स्थापन करण्याची भाजपची भूमिका होती. अडीच वर्ष मुख्यमंत्री देत असल्याचे सांगून देखील जाणून बुजून आपल्याला भाजप सोबत जायचे नाही, हा हेकेखोरपणा उद्धव ठाकरे यांनी केला आणि स्वतः मुख्यमंत्री पद मिळविण्यामध्ये यशस्वी झाले. निवडणुकीत पराभव झाला. पक्षाची हानी झाली तरी चालेल पण खुर्ची मला पाहिजे, या आग्रहामुळे घडलेले हे राजकारण असल्याची टीका शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केली. २०१४ साली भाजपने उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांचे नाव आले होते. परंतु एकनाथ शिंदे यांच्या नावाला उद्धव ठाकरे यांचा वैयक्तिक विरोध असल्याने त्यांनी ते पद स्विकारले नाही. भाजप नेत्यांसहित देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीशी संपर्कासाठी फोन केले. पण उद्धव ठाकरेंनी फोन घेतला नाही. मुख्यमंत्री पदासाठी भाजपचा एकनाथ शिंदे यांना कोणताही विरोध नव्हता, असे शिरसाट म्हणाले.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Silver Rate : चांदीच्या दरात आतापर्यंतची सर्वाधिक वाढ, जाणून घ्या आजचे दर…

Vegetable Rates : सर्वसामान्यांसाठी महत्वाची बातमी; आवक घटल्याने भाजीपाल्याच्या भावात २० ते २५ टक्क्यांची वाढ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button