Gulabrao Patil : जळगावचे पालकमंत्रिपद पुन्हा गुलाबराव पाटलांचं? अधिकृत घोषणा आधीच केली मोठी जाहीर घोषणा!

हॅलो जनता न्युज :
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद कोणाला मिळणार यावर जोरदार चर्चा सुरु आहे. सध्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी विविध नेत्यांकडून लॉबिंग सुरू आहे. त्याच दरम्यान, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी स्वतःच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याचे घोषित केले आहे, ज्यामुळे राजकारणात एक चांगलीच धुसफूस झाली आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांची ओळख आक्रमक नेत्याची आहे. जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत रस्सीखेच सुरु असताना, गुलाबराव पाटील यांनी नुकत्याच एका भाषणात जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून आपले नाव घोषित केले.
गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) वावदडा गावातील विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी जोरदार भाषण करत, पालकमंत्री पदाचा सखोल विचार मांडला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी कधीही तयार असल्याचे सांगितले.
“सरकार काठावर जाईल असं सगळ्यांना वाटलं होतं, पण आम्हाला बंपर बहुमत मिळालं. 237 जागा निवडून आल्या. लाडक्या बहिणींनी असा करंट मारला की त्यांचे सावत्र भाऊ डायरेक्ट ठार झाले. राजकारण हे कार्यकर्त्यांच्या भरोशावर असतं. ज्या नेत्याकडे चांगले कार्यकर्ते आहेत, तो नेता श्रीमंत असतो. मी आतापर्यंत मंत्रीपद दाखवलं नाही, पण जर माझ्या कार्यकर्त्यांकडे वाकड्या नजरेने बघितलं, तर मी पालकमंत्री काय असतो, ते दाखवून देईन,” असं ते म्हणाले.
वर्तमानात जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत, हे निश्चित झालेलं नाही, मात्र गुलाबराव पाटील यांनी स्वतःच आपली घोषणा केली असल्याने, त्यांच्या पालकमंत्री म्हणून नियुक्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
देशाच्या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिकेला अभिवादन, फातिमा शेख यांच्या कार्याचा सन्मान
Santosh Deshamukh : जालना मोर्चात मुलीची भावुक हाक – ‘तुम्ही माझ्या वडिलांना इतका छळ करून का मारला?’