हॅलो राजकारण
Mahavikas Aghadi : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाविकास आघाडी च्या वतीने निषेध
हॅलो जनता न्युज, जळगाव Mahavikas Aghadi
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याचा निषेध महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने करण्यात आला असून जळगाव शहरातील शिवसेना कार्यालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पर्यंत जाऊन बाबा साहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आला.
यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, महानगर प्रमुख शरद तायडे, काँग्रेस महानगर जिल्हाध्यक्ष शाम तायडे, अल्पसंख्यांक आघाडी महानगर प्रमुख जाकिर पठाण, सरचिटणीस दीपक सोनवणे, राहुल भालेराव आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.