Jalgaon Crime : जावयावर हल्ला करणाऱ्या सासरच्या हल्लेखोरांना आठ दिवस कोठडी

हॅलो जनता न्युज, जळगाव :
Jalgaon Crime : प्रेमविवाह केल्याच्या रागातून सासरच्या मंडळींनी मुकेश रमेश शिरसाठ (वय २६, रा. पिंप्राळा हुडको) या तरुणावर सशस्त्र हल्ला करीत त्याची हत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलासह सात जणांना अटक केली. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केल असता, न्यायालयाने त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील रहिवासी मुकेश शिरसाठ हा तरुण आई, वडील, भाऊ यांच्यासह राहतो. तीन ते चार वर्षांपूर्वी त्याने त्याच परिसरात राहणाऱ्या पूजा नामक तरुणीशी पळून जाऊन विवाह केला होता. तेव्हापासून सासरच्या मंडळींकडून मुकेशला धमकी दिली जात होती. रविवारी सकाळी मुकेश हा दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर आला. त्यावेळी मुकेशच्या सासरच्यांनी ‘तुला जास्त माज आला आहे, तू पूजाशी पळून जाऊन लग्न केले आहे. तुला व तुझ्या परिवाराला या पूर्वी सोडून दिले. आता संपवून टाकू’ असे मुकेशला म्हणत त्यांनी कोयता, चॉपरने त्याच्या मानेवर वार केला. त्यात तो रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाला. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता.
Jalgaon Crime : सात जणांना अटक तर दोघे फरार
तपासचक्रे फिरवित पोलिसांनी हल्ला करणाऱ्या सतिष जुलाल केदार (वय ४२), प्रकाश शंकर सोनवणे (वय २९), सुरेश भूताजी बनसोडे (वय ४७), अश्विन सुरवाडे, विशाल उर्फ बबल्या राजू गांगले (वय २५), बबलू सुरेश बनसोडे याच्यासह एका अल्पवयीन मुलाला अटक केली. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तसेच फरार असलेल्या दोघांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
Jalgaon Crime : प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणाची हत्या