हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – वर्षभरापूर्वी आईने दुसरे लग्न केलेल्या सावत्र बापानेच दहा वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार केला. ही घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली. मुलीस रक्तस्राव होऊन बेशुद्ध पडल्यानंतर आईने तिला घटनेची वाच्यता न करण्यासाठी धमकावले. त्यानंतरही वडिलांनी दोन वेळेस अत्याचाराचा प्रयत्न केल्याने मुलीने घरातून पळ काढत गुरुवारी शहर गाठत परिचयातील मावशीकडे धाव घेतल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
काही वर्षापूर्वी छत्रपती संभाजी नगर मधील एका भागात राहणाऱ्या दहावर्षीय मुलीच्या वडिलांचे निधन झाल्याने आईने बुलढाणा जिल्ह्यातील रुईखेड मायंबा येथील एका शेतकऱ्यासोबत दुसरे लग्न केले. पंधरा दिवसांपूर्वी सावत्र पित्याने तिच्यावर अमानुष अत्याचार केला. त्यानंतरही दोन वेळेस अश्लील कृत्य केले. यामुळे मुलगी तणावाखाली जाऊन आजारी पडली. गुरुवारी दुपारी तिने घर सोडले. बसने ती शहरात सिडको बसस्थानकावर उतरली. तेथे रडत असताना हनुमाननगरच्या एका तरुणाने तिची विचारपूस केली. तेव्हा तिने शिवाजीनगरमधील परिचयातील मावशीचा मोबाइल क्रमांक सांगितला.
अत्याचार : चक्क आईने अत्याचारांनंतर कुणाला सांगू नको म्हणून बजावले.
पहिल्या अत्याचारानंतर राणी रक्तस्राव होऊन बेशुद्ध पडली. आईने मात्र तिला कोणाला सांगू नकोस, असे बजावले. त्यानंतरही बापाने तिच्यासोबत दोनदा अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न करत घरात कोंडले. गळ्याला चटके दिल्याचेही राणीने पोलिस आयुक्तालयात सांगितले.
अत्याचार : पैशांचा गल्ला फोडला अन् घर सोडले
छळ असह्य झाल्याने राणीने गुरुवारी दुपारी तिचा पैशांचा गल्ला फोडून तिकिटासाठी पैसे घेतले. रात्री उशिरा तापाने फणफणलेल्या राणीला विश्वासात घेतल्यानंतर तिने मावशीकडे आपबीती कथन केली. ही बाब कळताच पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी तत्काळ पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर शुक्रवारी रात्री भरोसा सेलच्या कर्मचाऱ्यांनी तिचा जबाब नोंदवला.
इतर महत्वाच्या बातम्या….
💥 ब्रेकिंग : पणन मंत्री जयकुमार रावल यांचा जळगाव जिल्हा दौरा
💥 ब्रेकींग : पाचोरा हादरले, चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीचा गळा चिरून खून
💥गाळण गावात पाटील कुटुंबाचा स्तुत्य उपक्रम, उत्तरकार्याच्या खर्चातून शालेय साहित्य वाटप
