⁠हॅलो क्राईम

Jalgaon Crime : प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणाची हत्या

हॅलो जनता न्युज, जळगाव :

Jalgaon Crime : प्रेमविवाह केल्याच्या रागातून दोन कुटुंबांमध्ये वाद सुरु होता. तरुणीच्या माहेरच्या मंडळींनी मुकेश रमेश शिरसाठ (वय २६, रा. पिंप्राळा हुडको) या तरुणासह त्याच्या कुटुंबियांवर धारदार कोयता व चॉपरने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुकेशचा मृत्यू झाला असून त्याचे कुटुंबातील सात जण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास पिंप्राळा हुडको परिसरात घडली. जखमींमध्ये मयत तरुणाच्या भावासह, काका, काकू, चुलत भाऊ व बहिणीचा समावेश आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात तरुणीचा भाऊ, काका यांच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात मुकेश शिरसाठ हा तरुण आई, वडील, भाऊ यांच्यासह वास्तव्यास होता. तीन ते चार वर्षांपूर्वी त्याने त्याच परिसरात राहणाऱ्या पूजा नामक तरुणीशी प्रेमविवाह केला होता. तेव्हापासूनच शिरसाठ कुटुंबीय व तरुणीच्या माहेरील मंडळींमध्ये वाद सुरू आहे. रविवारी सकाळी मुकेश हा दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर आला. त्या वेळी पूजाचे काका सतीश जुलाल केदार, भाऊ प्रकाश शंकर सोनवणे, बाबा सुरेश भुताजी बनसोडे, बबलू सुरेश बनसोडे, चुलत भाऊ राहुल शांताराम सोनवणे, पंकज शांताराम सोनवणे, आतेभाऊ अश्वीन सुरवाडे, विक्की राजू गांगले, बबल्या राजू गांगले यांच्यासह इतर दोन अनोळखी त्याठिकाणी आले.

Jalgaon Crime : टोळक्याने चॉपरसह कोत्याने केले सपासप वार
‘तुला जास्त माज आला आहे, तू पूजाशी पळून जाऊन लग्न केले आहे. तुला व तुझ्या परिवाराला या पूर्वी सोडून दिले. आता संपवून टाकू’ असे मुकेशला म्हणत त्यांनी कोयता, चॉपरने त्याच्या मानेवर सपासप वार केला. त्यात तो रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाला. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचार सुरू असताना दुर्देवी मृत्यू झाला.

या हल्ल्यात सात ते आठ जणांनी त्याच्या कुटुंबावर चॉपर, कोयता, चाकू आणि लाकडी काठीने हल्ला केला. या हल्ल्यात निळकंठ सुखदेव शिरसाठ (वय ४५), कोमल निळकंठ शिरसाठ (वय २१), निळकंठ शिरसाठ (वय २५), ललिता निळकंठ शिरसाठ (वय ३०) आणि सनी निळकंठ शिरसाठ (वय २१) हे गंभीरपणे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Amalner : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; १०-१२ जणांना चावा

Amalner : हिंगोणे येथे महिलेचा विनयभंग करत मारहाण

Nylon Manja : नायलॉन मांजा विकणाऱ्या आठ जणांविरुद्ध कारवाई

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button