Headlines

कबचौ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव यांच्या वतीने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन संपन्न

कबचौ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव यांच्या वतीने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन संपन्न

हॅलो जनता न्युज, जळगाव :

कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य व व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई यांच्या आदेशानुसार, तसेच जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी संतोष साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली, कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव व जिल्ह्यातील सर्व आयटीआय संस्थांच्या सहभागातून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगांव प्रांगणात जिल्हा क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.

उद्घाटन समारंभाचे आयोजन प्राचार्य अभियांत्रिकी महाविद्यालय जळगांव डॉ. सुहास गाजरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आयटीआय भुसावळ/पाचोरा येथील प्राचार्य एम. एस. राजपूत, शिवकुमार जुमनाके, संस्थेच्या उपप्राचार्य राजश्री पाटील आणि गट निदेशक नितीन चौधरी उपस्थित होते.

प्रस्तावना गट निदेशक नितीन चौधरी यांनी केली, तर सूत्रसंचलन महेश सुर्यवंशी यांनी केले. एल. पी. धांडे, डी. डी. देवरे, एम. पी. पाटील, सि. वि. घोडके, एस. आर. बोरोले, शिल्पनिदेशक, कार्यालयीन कर्मचारी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी रमेश सपकाळ यांनी मानले.

 

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

देशाच्या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिकेला अभिवादन, फातिमा शेख यांच्या कार्याचा सन्मान

Government Job : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी ; जाणून घ्या.. संपूर्ण माहिती

Santosh Deshamukh : जालना मोर्चात मुलीची भावुक हाक – ‘तुम्ही माझ्या वडिलांना इतका छळ करून का मारला?’

5,447Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION