Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर चाकू हल्ला, बॉलिवूडमध्ये धक्का

हॅलो जनता न्युज, मुंबई :
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर ( Saif Ali Khan Attack ) मध्यरात्री चाकू हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. काल रात्री २ वाजता सैफच्या घरात घुसलेल्या एका चोराने सैफवर चाकूने ६ वार केले, ज्यामुळे सैफ गंभीरपणे जखमी झाला. हल्लेखोर चोरीच्या उद्देशाने घरात घुसला की त्याचा काही अन्य हेतू होता, याबाबत माहिती स्पष्ट होऊ शकलेली नाही. तथापि, हल्लेखोर रातभर सैफच्या घरात दबा धरून बसला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हल्ला घडल्याचे समजल्यावर सैफने बाहेर येताच त्याच्यावर हल्ला करण्यात आला. हल्ल्याच्या वेळी सैफच्या घरातील मोलकरीणही जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सैफवर सध्या लीलावती रुग्णालयात सर्जरी सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
सैफच्या ( Saif Ali Khan Attack ) घरात हल्लेखोर कसा प्रवेश केला, त्याने गेट वापरला की भिंतीवरून उडी मारून घरात घुसला, हे सर्व प्रश्न पोलिस तपासत आहेत. सैफच्या घरातील मोलकरीण आणि हल्लेखोर यांच्यातील वाद आणि त्यांचा एकमेकांशी कसा संबंध होता याचा तपासही सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी सात पथके गठीत केली असून, एक टीम मुंबईबाहेरही पाठवली आहे. सैफच्या घरातील काही सदस्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांच्या मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
सैफवर झालेल्या हल्ल्याची बातमी समोर येताच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी चिंता व्यक्त केली आहे. सैफच्या ‘देवरा’ चित्रपटातील सहकलाकार आणि अभिनेता ज्युनियर एनटीआरने सोशल मीडियावर पोस्ट लिहून हल्ल्याची बातमी ऐकून शोक व्यक्त केला आहे. “सैफ सरांवरील हल्ल्याबद्दल ऐकून मला धक्का बसला आहे. मी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो,” असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे.
Amalner : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; १०-१२ जणांना चावा