Government Job : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी ; जाणून घ्या.. संपूर्ण माहिती
हॅलो जनता न्युज :
सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी समोर आली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूरने शिक्षण आणि संशोधन शाखांतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेत अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, विज्ञान, कला आणि इतर क्षेत्रांशी संबंधित विविध पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांना 31 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
पात्रता काय? उमेदवारांसाठी आवश्यक पात्रता म्हणजे संबंधित क्षेत्रातील पदवी, MCA, MSc, B.Tech, BE, हॉटेल व्यवस्थापन, व्यवसाय प्रशासन, एमफिल किंवा इतर पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा: या भरतीसाठी उमेदवारांचे वय 21 ते 57 वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमांनुसार सवलत मिळेल.
Government Job : अर्ज शुल्क:
गट A पदांसाठी, सामान्य, OBC आणि EWS उमेदवारांसाठी 1000 रुपये अर्ज शुल्क.
SC, ST आणि PH उमेदवारांसाठी 500 रुपये शुल्क.
गट B आणि C पदांसाठी, सामान्य, OBC आणि EWS उमेदवारांसाठी 700 रुपये शुल्क.
SC, ST आणि PH उमेदवारांना शुल्कातून सवलत.
महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क पूर्णपणे मोफत आहे.
अर्ज कसा करावा:
आयआयटी कानपूरच्या www.iitk.ac.in वेबसाइटवर जा.
‘ऑनलाइन अर्ज करा’ लिंकवर क्लिक करा.
‘Register New User’ वर क्लिक करा आणि आवश्यक तपशील भरून नोंदणी करा.
लॉगिन करा, अर्ज भरा आणि श्रेणीनुसार अर्ज शुल्क भरा.
फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट काढा आणि सुरक्षित ठेवा.
त्यानुसार, इच्छुक उमेदवारांना या मोठ्या संधीचा फायदा घेण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Jalgaon ZP : बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार, जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओंचे निर्देश…