Headlines

बनावट कागदपत्रांद्वारे ६३ कोटींच्या वाढीव मोबदल्याचा दावा; जळगावातील दोन वकील अटकेत.

हॅलो जनता प्रतिनिधी : जळगाव  बनावट कागदपत्रांच्या आधारे भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळविण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केल्याप्रकरणी जळगावातील दोन वकिलांना अटक करण्यात आली आहे. ॲड. किशोर बाबुराव पाटील (रा. मोहाडी रोड, जळगाव) आणि ॲड. प्रशांत नाना बाविस्कर (रा. पाळधी, ता. जामनेर) अशी अटक करण्यात आलेल्या वकिलांची नावे असून, या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी…

Read Full News

फायनान्स कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांने रचला लुटीचा कट ; भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा पर्दाफाश.

जळगाव/ भडगाव : भारत फायनान्स कंपनीतून जमा झालेली ५१ हजार ५६० रुपयांची रोकड घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्याची बॅग हिसकावून लुटल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणात फायनान्स कंपनीत काम केलेल्या माजी कर्मचाऱ्यानेच साथीदारांच्या मदतीने लुटीचा कट रचल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. आरोपींकडून २५ हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे….

Read Full News

बांधकाम कामगाराला मोफत सुरक्षा कीट देण्यासाठी १०० रुपयांची लाच घेताना तरुणी ‘लाचलुचपत’ च्या जाळ्यात.

जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अत्यावश्यक संच व सुरक्षा संच वितरण योजनेत लाभार्थ्यांकडून बेकायदेशीररीत्या पैसे उकळणाऱ्या भाग्यश्री विजय पाटील (वय २०, रा. सामनेर, ता. पाचोरा, जि. जळगाव) या खाजगी महिलेविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) यशस्वी सापळा कारवाई केली. या कारवाईदरम्यान घटनास्थळावरून लाभार्थ्यांकडून कथितरित्या वसूल…

Read Full News

जळगाव वाहतूक शाखेची विशेष मोहीम, २७१ वाहनचालकांवर कारवाई‌ ; २.०२ लाखांचा दंड वसूल

जळगाव,  : जिल्ह्यात शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने जळगाव शहर वाहतूक शाखेकडून विशेष वाहतूक अंमलबजावणी मोहीम राबविण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात आली. या विशेष मोहिमेदरम्यान एकूण २७१ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून २ लाख २ हजार ३००…

Read Full News

भडगाव शनैश्वर महाराज यात्रा उत्सवात जुगारचा कहर ; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.

भडगाव : शनैश्वर महाराज यात्रा उत्सव दरम्यान शनि अमावस्या व शनी जयंतीच्या पर्वकाळात मोठ्या उत्साहात यात्रा भरविण्यात आली होती. यात्रेसाठी परिसरातील हजारो भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. विविध पालख्या, खेळण्यांची दुकाने, हलवाई व खाद्यपदार्थांच्या स्टॉलमुळे संपूर्ण यात्रा परिसर गजबजून गेला होता. मात्र धार्मिक वातावरणात भरलेल्या या यात्रेला सोरट व पत्त्यांच्या जुगाराने गालबोट लागल्याची चर्चा…

Read Full News

मांडकी परिसरातून अवैध वाळू उपसा करणारी बोट जप्त.

हॅलो जनता प्रतिनिधी  महसूल विभागाची मध्यरात्री धडक कारवाई ; वाळू माफियांमध्ये खळबळ भडगाव : तालुक्यातील मांडकी परिसरातील नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर महसूल विभागाने मोठी कारवाई करत एक संशयित बोट जप्त केली. तहसीलदार शितल सोलट यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, या घटनेमुळे वाळू माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मांडकी…

Read Full News
जळगावात ‘नाईट कोम्बिंग ऑपरेशन’ ; ७० बसेसची तपासणी, २० हजारांचा दंड वसूल

जळगावात ‘नाईट कोम्बिंग ऑपरेशन’ ; ७० बसेसची तपासणी, २० हजारांचा दंड वसूल

हॅलो जनता न्यूज – जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी जळगाव पोलीस दलाने अवैध प्रवासी वाहतूक, अंमली पदार्थ व शस्त्रास्त्र तस्करी रोखण्यासाठी मंगळवारी मध्यरात्री विशेष ‘नाईट कोम्बिंग ऑपरेशन’ राबविले. या धडक कारवाईत तब्बल ७० खाजगी ट्रॅव्हल्स बसेसची सखोल तपासणी करण्यात आली. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांकडून २० हजार रुपयांचा प्रलंबित…

Read Full News

भडगावात गुन्हेगारीचे साम्राज्य ! अवैध धंद्यांचा कळस ; नागरिक संतप्त.

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील भडगाव : शहर व तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असून अवैध धंद्यांनी अक्षरशः मोकाट धाव घेतल्याचे चित्र आहे. दारू, मटका, जुगार आणि अमली पदार्थ विक्रीसारखे प्रकार उघडपणे सुरू असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर…

Read Full News

दोन मुलांना वाचवताना युवक व महिलेचा बुडून मृत्यू; भडगाव शहरात शोककळा.

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील  भडगाव : शहरातील गिरणा नदी पात्रात दोन लहान मुलांना वाचवताना एका युवकासह महिलेचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (दि. ८) दुपारी १२ वाजेच्या सुमारास आझाद चौक ते पेठ भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाजवळ घडली. या दुर्दैवी घटनेमुळे भडगाव शहरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गिरणा…

Read Full News

अवैध गौणखनिज वाहतुकीला लगाम.

वाक गावाजवळ महसूल विभागाची मध्यरात्री धडक कारवाई : डम्पर जप्त भडगाव : तालुक्यात अवैध गौणखनिज वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने कडक भूमिका घेत मध्यरात्री धडक कारवाई केली. मौजे वाक, ता. भडगाव परिसरात अवैधरीत्या गौणखनिज वाहतूक करणारा एक डम्पर महसूल पथकाने जप्त केला आहे. ही कारवाई भडगावच्या तहसीलदार शितल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २९ जानेवारी २०२६ रोजी रात्री…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION