Headlines

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक कार्यालय; चंद्रकांत पाटील यांचा मोठा प्रस्ताव

जळगावमध्ये आधुनिक सहसंचालक कार्यालयाचे उद्घाटन; राज्यातील सहा हजार महाविद्यालयांच्या प्रशासकीय कामकाजाला गती देण्याचा प्रयत्न हॅलो जनता | प्रतिनिधी जळगाव : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि सुलभ करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षण विभागाचे स्वतंत्र सहसंचालक कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाने पुढे आणला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती उच्च व…

Read Full News
ST Bus Stop

ST Bus Stop: विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील बस थांबा नावालाच; एसटी बसेस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय!

हॅलो जनता प्रतिनिधी, जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बस थांबा(ST Bus Stop) उभारण्यात आला आहे. मात्र, जळगाव बसस्थानकातून सुटणाऱ्या अनेक एसटी बसेस या थांब्यावर थांबत नसल्याने विद्यापीठातील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही एसटी महामंडळाकडून दखल घेतली जात नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी आता…

Read Full News

वसतिगृहातील विद्यार्थ्याला वैद्यकीय मदतीस विलंब ; चौकशीची मागणी.

जळगांव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वसतिगृहातील एका विद्यार्थ्याची प्रकृती अचानक गंभीर झाल्यानंतर त्याला तातडीने रुग्णवाहिका व वैद्यकीय मदत मिळण्यास विलंब झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेची सखोल चौकशी करून वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी २४ तास वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी विद्यार्थी प्रतिनिधी अशुतोषकुमार पाटील यांनी कुलगुरूंकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनानुसार, २८…

Read Full News

ब. ज. हिरण विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांची विभागीय वुशु स्पर्धेसाठी निवड.

हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव  कजगांव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय वुशु स्पर्धेत ब. ज. हिरण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. या स्पर्धेत विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनी आपल्या-आपल्या वजन गटात…

Read Full News

गौरी किशोर उशिर यांना दहावीत ९४.६० टक्क्यांनी नेत्रदीपक यश ; विविध संस्थांकडून गुणगौरव सोहळा.

नेरी ता. जामनेर : नेरी केंद्र शिक्षण प्रसारक को-ऑप. मंडळ लि. संचलित जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नेरी येथील गुणवंत विद्यार्थिनी गौरी किशोर उशिर हिने मार्च २०२६ मध्ये झालेल्या एस.एस.सी. परीक्षेत ९४.६० टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. गौरीने…

Read Full News

न्यू इंग्लिश स्कूल ग्राउंडवरील बंद स्ट्रीट लाईट तातडीने सुरू करा ; युवा मोर्चा शहराध्यक्ष योगेश शेलार यांची नगर परिषदेकडे मागणी.

भडगाव : शहरातील सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय (न्यु इंग्लिश स्कूल) मैदानावरील मुख्य स्ट्रीट लाईट गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवक-युवतींसह नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. ही स्ट्रीट लाईट तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे भडगाव शहराध्यक्ष योगेश शांताराम शेलार यांनी भडगाव नगर परिषदेचे…

Read Full News

माय भारत केंद्र जळगावच्या पुढाकाराने सारोळा येथे वृक्षारोपण अभियान उत्साहात संपन्न.

सारोळा (ता. पाचोरा) : माय भारत केंद्र जळगाव (युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार), युनिसेफ, यशदा, ग्रामपंचायत सारोळा आणि जिल्हा परिषद शाळा सारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वृक्षारोपण अभियान उत्साहात संपन्न झाले. या अभियानास सुधाकर मुंडे (गटविकास अधिकारी), वाल्मिक पाटील (उपसरपंच), अविनाश देशमुख (ग्रामपंचायत सदस्य), गिरीश कोकणी (कृषी विस्तार अधिकारी), विनोद…

Read Full News

युवा जलदिंडी अभियान उद्घाटन कार्यक्रम उत्साहात संपन्न.

पाचोरा : माय भारत केंद्र जळगाव (युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार), यशदा (महाराष्ट्र शासन), युनिसेफ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, समृद्ध जन फाउंडेशन तसेच पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “युवा जलदिंडी अभियान” उद्घाटन कार्यक्रम सोमवार, दि….

Read Full News

महाराष्ट्र दिनानिमित्त शिरपूरात विद्यार्थ्यांचा स्तुत्य सामाजिक उपक्रम.

हॅलो जनता न्यूज, शिरपूर प्रतिनिधी शिरपूर : १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत शिरपूर येथील आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षातील जळगाव विद्यार्थी संघटनेतर्फे एक सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत के. वा. पुसो एन. झेड. मराठे विद्यालय संस्था, थाळनेर संचलित अनाथ व मतिमंद मुला-मुलींच्या बालगृहात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे…

Read Full News
जळगाव Aagaz – The Beginning of Your Success Story

जळगावात विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन मेळावा; JEE, NEET व MHT-CET तयारीबाबत तज्ज्ञांचे मोफत मार्गदर्शन

हॅलो जनता न्यूज, जळगाव : विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करिअर मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. याच उद्देशाने विद्यापीठ पाठशाळे अंतर्गत फिजिक्स वाला अकादमी तर्फे जळगाव शहरातील भैयासाहेब धंदे सभागृह, ला.ना. स्कूल कॅम्पस येथे करिअर कौन्सलिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. Aagaz – The Beginning of Your Success Story या उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION