हॅलो सामाजिक

गाळण बु. शिवारात बिबट्याच्या ठशांचे दर्शन ; शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन.

गाळण बु. (ता. पाचोरा) : येथील शिवारात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतात जाताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन वनविभाग मार्फत करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी एकट्याने शेतात जाणे टाळावे, शक्यतो समूहाने शेतात जावे. शेतात प्रवेश करताना मोठ्याने आवाज करावा तसेच आवश्यकतेनुसार फटाके फोडून बिबट्याची उपस्थिती असल्यास त्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

बिबट्याच्या ठशांबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली असून, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता सावधगिरी बाळगावी आणि बिबट्या किंवा त्याचे ठसे आढळल्यास त्याच्या जवळ न जाता तातडीने वनविभागाला माहिती द्यावी.

विशेषतः सकाळी व सायंकाळच्या वेळी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांनी अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button