हॅलो राजकारण

Ajit Pawar : धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी ; अजित पवारांचे स्पष्टिकरण

हॅलो जनता न्युज, मुंबई :

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यासाठी सोमवारी सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, शिष्टमंडळाने मुंडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

यावर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अप) अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंगळवारी चर्चेनंतर प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट केले की, चौकशीत अद्याप कोणाचेही नाव समोर आलेले नाही. “तीन स्वतंत्र यंत्रणांकडून हत्येची चौकशी सुरू आहे. जोपर्यंत चौकशीत कोणावरही ठपका ठेवला जात नाही, तोपर्यंत कारवाई कशी होईल?” असे पवार म्हणाले.

Ajit Pawar : चौकशी पारदर्शकपणे होईल
संतोष देशमुख हत्येच्या चौकशीला वेग देण्यात आला असून, बीड पोलिसांद्वारे विशेष चौकशी पथक स्थापन करण्यात आले आहे. त्याचबरोबर न्यायालयीन चौकशीची देखील घोषणा करण्यात आली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी ही चौकशी पारदर्शकपणे होईल आणि जेव्हा चौकशीत योग्य नावे समोर येतील, तेव्हा त्यानुसार कारवाई केली जाईल, असे सांगितले. त्याचवेळी, मुंडे यांना या प्रकरणी अभय देत पवार यांनी त्यांच्यावरील दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

जो पर्यंत पत्रकारांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तो पर्यंत मी आणि माझा पत्रकार संघ स्वस्त बसणार नाही – प्रवीण सपकाळे

Dharangaon : धरणगावातील शेतकऱ्याची या कारणामुळे आत्महत्या

Chhattisgarh : छत्तीसगडमधील विजापूरमध्ये नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला: IED स्फोटात 9 जवान शहीद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button