Chhattisgarh : छत्तीसगडमधील विजापूरमध्ये नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला: IED स्फोटात 9 जवान शहीद
हॅलो जनता न्युज, छत्तीसगड :
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. सुरक्षा दलाच्या वाहनावर आयईडीने लक्ष्य ठेवून केलेल्या स्फोटात 9 जवान शहीद झाले असून 6 हून अधिक जवान गंभीरपणे जखमी झाले आहेत. कुटुरू रोडवर हा स्फोट झाला, ज्या मार्गावर सुरक्षा दलाची वाहने जात होती.
हा धक्कादायक स्फोट कुटुरू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबेली गावाजवळ दुपारी २:१५ वाजता घडला. नक्षलवाद्यांनी सुरक्षादलाच्या वाहनाला लक्ष्य करत आयईडी स्फोट केला, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली आहे. सुरक्षा दलाची तुकडी दंतेवाडा, नारायणपूर आणि विजापूर जिल्ह्यांच्या संयुक्त ऑपरेशननंतर परतत असताना हा स्फोट घडला.
या स्फोटात आठ डीआरजी (डिस्ट्रिक्ट रिजर्व गार्ड) जवान आणि एक ड्रायव्हर शहीद झाले आहेत. स्फोटानंतर मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जखमी जवानांना उपचारासाठी त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Chhattisgarh : सुरक्षा दलाचे अधिकाऱ्यांचे महत्त्वाचे वक्तव्य
आयजी बस्तर यांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले की, “नक्षलवाद्यांनी घात लावून सुरक्षादलाच्या वाहनावर हा स्फोट केला. हा स्फोट आयईडीने केला आहे, आणि त्याचा उद्देश सुरक्षादलावर मोठा हल्ला करण्याचा होता.” या घटनेनंतर नक्षलवाद्यांच्या विरोधातील ऑपरेशन्सवर गहन चर्चा सुरू झाली आहे. सुरक्षा दलाने या प्रकारच्या हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी काय उपाययोजना घेतल्या आहेत, यावर आगामी काळात लक्ष ठेवले जाईल.
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
Jalgaon Fraud : जळगाव शहरातील डॉक्टराची फसवणूक ; काय आहे प्रकरण ?
Shinde Gat : शिंदे गटाच्या आमदाराची जीभ घसरली ; तुमच्यापेक्षा तर…