चोपडा ब्रेकिंग : गो तस्करांना मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अन्यथा, रोहित निकमांचा इशारा..
हॅलो जनता न्यूज, चोपडा – तालुक्यात गावठी गायींचे बळजबरीने उद्ध्वस्तीकरण, गोरक्षकांवर हल्ले व धमक्यांच्या घटनांमुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पणन महासंघाचे उपाध्यक्ष व भाजप महाराष्ट्र राज्य सहकार आघाडीचे सह-संयोजक रोहित निकम यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी व चोपडा शहर पोलिस स्टेशनला प्रत्यक्ष भेट देऊन निवेदन सादर केले. यावेळी गोरक्षकांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही. हा संपूर्ण गंभीर प्रकार मुख्यमंत्री महोदयांच्या समक्ष मांडणार असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले…
चोपडा ब्रेकिंग: यांची होती उपस्थिती…
यावेळी भाजप गटनेते गजेंद्र जैस्वाल, शरद पाटील, अनिल वानखेडे, सागर नेवे, जिग्नेश कंखरे, संग्राम परदेशी, श्याम सोनार, मनीष गुजराथी, हरीश माळी, प्रेम घोगरे, विशाल भावसार, मनोहर बडगुजर, अशोक शिंपी, कमलेश सोनवणे, विशाल भोई यांसह पदाधिकारी आणि गोरक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चोपडा तालुक्यातील ग्रामीण भागात गोरक्षकांकडून वाचवलेल्या गायींचे पोलिस प्रशासनाच्या सांगण्यावरून बळजबरीने उद्ध्वस्तीकरण होत आहे. गोरक्षकांना धमक्या देणे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे व त्यांना करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. निकम यांनी तक्रारीची दखल घेतल्याने गोरक्षकांनी त्यांचे आभार मानले आहेत.
चोपडा ब्रेकिंग मुख्यमंत्री महोदयांसमोर विषय मांडणार – रोहित निकम…
गौहत्या प्रतिबंधक कायद्याची पायदळी तुडवली जात आहे. गावठी गायींचे बळजबरीने उद्ध्वस्तीकरण तात्काळ थांबवावे. गोरक्षकांवरील सर्व गुन्हे रद्द करावेत. गौहत्या प्रतिबंधक कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी. आदी मागण्याचे निवेदन त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहे.




