हॅलो राजकारण

भडगावात शिवसेनेची ताकद वाढली; भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात भव्य प्रवेश.

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील 

भडगाव : शहरातील राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी घटना समोर आली असून शिवसेना (शिंदे गट) दिवसेंदिवस अधिक बळकट होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. नुकत्याच पार पडलेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात भाजपाचे वाल्मीक पवार, विश्वनाथ भोई यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली.

हा पक्षप्रवेश सोहळा कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या नेतृत्वाला पाठिंबा देण्याची भावना यामागे असल्याचेही सांगण्यात आले.

या राजकीय घडामोडींमुळे भडगावच्या राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात सत्तासमीकरणांवर त्याचे परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढत असून विरोधकांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

यावेळी नगरपरिषदेचे गटनेते लकीचंद पाटील, नगरसेवक डॉ. विजयकुमार देशमुख, असीम मिर्झा, जहांगीर मालचे, सुनील देशमुख, युवराज पाटील, अतुल पाटील, अतुल परदेशी, जगन भोई, देवा अहिरे, विजयकुमार भोसले, संतोष महाजन, विशाल पाटील, रावसाहेब पाटील, राहुल ठाकरे, अलीम शहा, शिवसेना तालुकाप्रमुख सुधाकर पाटील, बबलू देवरे, आबा चौधरी, निशांत सोमवंशी, निलेश चव्हाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकूणच, या पक्षप्रवेशामुळे भडगावच्या राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळाल्याचे स्पष्ट होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button