गिरणा नदी पात्रात अवैधरित्या गौण खनिज उत्खनन व वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर महसूल सहाय्यक प्रशांत किसन सावकारे, मिलींद निकम, रामकृष्ण मनोरे तसेच भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शासकीय वाहनातून गस्त सुरू केली. रात्री दहा वाजताच्या सुमारास गिरड–मांडकी रस्त्यावर गिरणा नदीकडून येणारे एक जेसीबी, सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर आणि दोन डंपर अवैध वाळूने भरलेले आढळून आले. वाहन चालकांकडे परवाना नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वाहने तहसील कार्यालयात जमा करण्याचे आदेश देण्यात आले.
भडगाव : मध्यरात्री दगडफेक अन् कर्मचाऱ्यांशी हुज्जत…
यानंतर महसूल व पोलिस पथकाने नवीन चालकांच्या मदतीने सर्व वाहने तहसील कार्यालयात आणून पंचनामा करत जप्त केली. जप्त मुद्देमालात १५ लाखांचे जेसीबी, २ लाखांचा सोनालिका ट्रॅक्टर, प्रत्येकी १० लाखांचे दोन डंपर व त्यातील वाळू असा एकूण ३७.२८ लाख रुपयांचा मुद्देमाल समाविष्ट आहे.
या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७८/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार ज्ञानेश्वर पाटील करीत आहेत. अवैध वाळू व्यवसायावर कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या…..
🚨 जळगाव ब्रेकिंग : भाजपाचा आक्षेप, एका राजकीय पक्षाच्या सर्वच उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप…
भडगाव शेत शिवारात रंगली शेतकऱ्यांची कार्यशाळा.
