ब्रेकिंग : भडगाव वाळू माफिया कारवाई : महसूल विभागाची व्हॉटअप वर प्रेस नोट, कारवाई संदर्भात संभ्रम…
भडगाव (विशेष प्रतिनिधी) : तालुक्यातील मौजे वाक शिवारात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात भडगाव महसूल प्रशासनाने गुरुवारी (दि. ९ ऑक्टोबर) सकाळी धडक कारवाई केली. तहसीलदार शीतल सोलाट यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सकाळी ८ वाजता अचानक छापा टाकत वाळू वाहतुकीशी संबंधित ७ डंपर, २ जेसीबी आणि ३ ट्रॅक्टर अशी एकूण १२ वाहने जप्त केली. या कारवाईमुळे परिसरातील…
