Headlines

🚨 ब्रेकिंग : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा जळगाव दौरा रद्द, निवडणूक धामधुमीत प्रशासनाला दिलासा

हॅलो जनता न्यूज, जळगाव – ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा जळगाव जिल्ह्याचा नियोजित दौरा अखेर रद्द करण्यात आला आहे. दि. ४ ते ७ जानेवारी २०२६ या कालावधीत होणारा हा दौरा रद्द झाल्याची अधिकृत माहिती राज्य शासनाच्या राजशिष्टाचार विभागाने मंगळवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्राद्वारे कळविली आहे. त्यामुळे निवडणूक व्यवस्थापनात गुंतलेल्या प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.

जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सध्या उमेदवारी छाननी, आचारसंहिता अंमलबजावणी, कायदा-सुव्यवस्था तसेच सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करून आहे. अशा परिस्थितीत उपराष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे अतिरिक्त सुरक्षा, प्रोटोकॉल आणि नियोजनाची जबाबदारी प्रशासनावर येणार होती. त्यामुळे दौरा निश्चित झाल्यापासून प्रशासनाची कसरत वाढली होती.

उपराष्ट्रपतींच्या दौऱ्यात विविध शासकीय कार्यक्रम, अधिकाऱ्यांसोबत बैठका तसेच सार्वजनिक कार्यक्रमांचा समावेश होता. यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त, वाहतूक व्यवस्थापन आणि इतर विभागांचा समन्वय आवश्यक होता. मात्र दौरा रद्द झाल्याने आता प्रशासन संपूर्णपणे निवडणूक प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करू शकणार आहे.

दरम्यान, दौरा रद्द होण्यामागील नेमके कारण अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेले नसले, तरी निवडणुकीची व्यस्तता आणि प्रशासकीय अडचणी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे. उपराष्ट्रपतींचा जळगाव दौरा पुढील कालावधीत नव्याने निश्चित केला जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

🚨 ब्रेकिंग : भडगावात पाचोऱ्यातील २० ते २५ वाळू माफियांविरुद्ध गुन्हा, कर्मचाऱ्यांवर दगडफेक करणे पडले महागात

🚨 जळगाव ब्रेकिंग : भाजपाचा आक्षेप, एका राजकीय पक्षाच्या सर्वच उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप…

🚨ब्रेकिंग : जळगाव मनपा निवडणूक : महायुतीचा जागावाटपाचा फार्मूला अखेर निश्चित, आज सायंकाळी अधिकृत घोषणा…

1,087Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION