याच अनुषंगाने शहर आणि तालुक्यातील उपद्रवी, गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. ज्यांच्यावर दोन किंवा त्याहून अधिक गुन्हे दाखल आहेत, अशा संशयित व्यक्तींना पोलिसांनी नोटिसा बजावल्या असून त्यांच्यावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.
भडगाव पोलीस : उमेदवारीसाठी इच्छुकही पोलिसांच्या रडारवर
धक्कादायक म्हणजे, पोलिसांच्या यादीत ज्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे, त्यात काही जण आगामी भडगाव नगरपरिषद तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्याची इच्छा व्यक्त करत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या कारवाईनंतर स्थानिक राजकारणातही खळबळ उडाली आहे.
पोलिसांचा इशारा – शांततेला बाधा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई
भडगाव पोलिसांनी सांगितले की, “निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी पोलीस दल सज्ज आहे. कोणत्याही प्रकारचा अनुशासनभंग, धमकी, गोंधळ किंवा बेकायदेशीर कृती सहन केली जाणार नाही. उपद्रवी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर आवश्यक ती कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.” स्थानिक नागरिकांनाही पोलिस प्रशासनाने शांततेचे आणि कायद्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. (सविस्तर वृत्त लवकरच….)
इतर महत्वाच्या बातम्या…
🚨पाचोरा ब्रेकिंग : पाचोऱ्याच्या नगरध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर, यांना मिळणार उमेदवारी…
भाजपला मोठा धक्का! निर्धार मेळाव्यात यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश होणार…
