हॅलो राजकारण

🚨 ब्रेकिंग : शिंदे सेनेचे नगरसेवक लखीचंद पाटील यांची भडगाव नगरपालिकेच्या गटनेतेपदी निवड….

हॅलो जनता न्यूज, भडगाव प्रतिनिधी – भडगाव नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली दणदणीत विजय मिळवत नगरपालिकेवर वर्चस्व सिद्ध केले आहे. या विजयामागे निवडणूक व्यवस्थापन, रणनीती आणि संघटन कौशल्य महत्त्वाची ठरली असून, त्यात लखीचंद पाटील यांनी बजावलेली भूमिका निर्णायक ठरली आहे.

संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे नियोजन, उमेदवारांचे समन्वय, प्रचार यंत्रणेची आखणी आणि कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचे काम लखीचंद पाटील यांनी प्रभावीपणे पार पाडले. याचा थेट फायदा शिंदे सेनेला झाला असून नगराध्यक्ष रेखा मालचे यांच्यासह पक्षाचे मोठ्या संख्येने नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून आले असून भडगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय शिवसेनेने प्राप्त केला आहे.

भडगाव शहर व तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनतेशी सातत्याने संपर्क ठेवत त्यांनी एक सकारात्मक व विश्वासार्ह प्रतिमा निर्माण केली आहे. याच जनाधाराचा लाभ निवडणुकीत पक्षाला मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी लखीचंद पाटील यांची भडगाव नगरपालिका शिंदे सेनेच्या गटनेतेपदी निवड केली आहे.

लखीचंद पाटील यांची गटनेते पदी निवड, शुभेच्छांचा वर्षांव

नगरपालिकेत एखाद्या पक्षाचे सर्वाधिक किंवा प्रभावी नगरसेवक असतील, तर त्या पक्षाच्या नगरसेवकांचा प्रमुख म्हणून गटनेता निवडला जातो. गटनेता हा नगरपालिकेतील पक्षाचा अधिकृत प्रतिनिधी मानला जातो. पक्षाच्या सर्व नगरसेवकांमध्ये समन्वय साधणे, नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभा, स्थायी समिती व इतर बैठकीत पक्षाची भूमिका मांडणे, विकासकामे, प्रस्ताव व ठरावांबाबत पक्षाची भूमिका निश्चित करणे, नगराध्यक्ष व प्रशासनाशी समन्वय ठेवणे, पक्षाच्या धोरणांनुसार नगरपालिकेचे निर्णय होण्यासाठी प्रयत्न करणे, नगरसेवकांच्या अडचणी, प्रश्न वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचवणे इत्यादी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या गटनेतेच्या असतात..

गटनेतेपद हे केवळ मानाचे नसून अत्यंत जबाबदारीचे पद मानले जाते. आगामी काळात भडगाव नगरपालिकेच्या कारभारात लखीचंद पाटील यांची भूमिका निर्णायक राहणार असून, शहराच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

🚨 ब्रेकिंग : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा जळगाव दौरा रद्द, निवडणूक धामधुमीत प्रशासनाला दिलासा

🚨 ब्रेकिंग : भडगावात पाचोऱ्यातील २० ते २५ वाळू माफियांविरुद्ध गुन्हा, कर्मचाऱ्यांवर दगडफेक करणे पडले महागात

🚨 जळगाव ब्रेकिंग : भाजपाचा आक्षेप, एका राजकीय पक्षाच्या सर्वच उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button