हॅलो राजकारण

विकास महाजन यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश; आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर व्यक्त केला विश्वास.

भडगाव : मतदारसंघात झालेल्या विकासकामांमुळे आणि आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या जनहिताभिमुख कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत विकास महाजन यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

यावेळी नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या विकास महाजन यांनी बोलताना, मतदारसंघात रस्ते, पाणीपुरवठा, मूलभूत सुविधा आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी आमदार किशोरआप्पा पाटील यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. विकासाच्या प्रवाहात सहभागी होऊन जनतेच्या हितासाठी काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमात गटनेते लखीचंद पाटील, नगरसेवक जितेंद्र आचारी, सुधाकर पाटील, महेंद्र ततार, रविंद्र पाटील, नितीन महाजन, सचिन पाटील, कुणाल पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या पक्षप्रवेशामुळे भडगाव शहर व परिसरातील शिवसेना संघटनेला अधिक बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, आगामी काळात आणखी अनेक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचेही बोलले जात आहे.

कार्यक्रमादरम्यान “विकासाच्या विचाराला साथ, किशोरआप्पांच्या नेतृत्वावर विश्वास” या घोषणांनी परिसर दणाणून गेला. नव्या कार्यकर्त्यांचे शिवसेना परिवारात जल्लोषात स्वागत करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button