अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जळगाव पश्चिम जिल्हा कार्यकारिणी जाहीर..
राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या आदेशाने नियुक्ती; जिल्हा कार्यकारिणी बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांची घोषणा
भडगाव : अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी कोंढरे यांच्या आदेशाने, राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष प्रदीप भिकनराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जळगाव पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

यासंदर्भात आज जळगाव येथे अखिल भारतीय मराठा महासंघाची जिल्हा कार्यकारिणी बैठक उत्साहात पार पडली. बैठकीत संघटनेची आगामी वाटचाल, संघटन विस्तार तसेच समाजातील विविध प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
जिल्हाध्यक्षपदी प्रदीप भिकनराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा उपाध्यक्षपदी किरण कैलास पवार, निलेश नथ्थू पाटील, सचिदानंद निळकंठ पाटील आणि चेतन अशोक पाटील यांची निवड झाली आहे. राकेश नथ्थू सोनवणे यांच्याकडे कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
जिल्हा सरचिटणीसपदी देविदास दौलत पाटील, जगदीश पिराजी पाटील, विजय दिनकर पाटील आणि जगदीश प्रदीप शिंदे (गंजे) यांची निवड करण्यात आली आहे. तर चिटणीसपदी अनिल लालचंद पाटील, पांडुरंग दयाराम सोनवणे आणि कार्तिक नामदेव मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मंगेश दिलीप चव्हाण यांच्यावर जिल्हा संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच धनवंत रामदास पाटील, कैलास दयाराम पाटील, परेश विक्रम पाटील, कैलास सर्जेराव पाटील आणि शैलेश चैत्राम पाटील यांची जिल्हा संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पिचर्डे येथील पत्रकार धनराज भिकन पाटील यांची जळगाव जिल्हा प्रसिद्धीप्रमुखपदी, तर लक्ष्मीकांत विनायकराव देसले यांची सोशल मीडिया प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जळगाव पश्चिम जिल्ह्यात अखिल भारतीय मराठा महासंघाचे संघटन अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे. समाजातील शैक्षणिक, सामाजिक, युवक, रोजगार, आरक्षण, विद्यार्थी तसेच विविध सामाजिक प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न मांडणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर प्रसिद्धीची जबाबदारी सोपविण्यात आल्याने महासंघाच्या विविध सामाजिक व समाजोपयोगी उपक्रमांना व्यापक प्रसिद्धी मिळण्यास मदत होणार आहे. तसेच पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांच्या अनुभवाचा महासंघाच्या आगामी उपक्रमांना निश्चितच फायदा होईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
नवनियुक्त जिल्हा कार्यकारिणीचे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधवांकडून अभिनंदन करण्यात येत असून, आगामी काळात जळगाव पश्चिम जिल्ह्यात महासंघाचे संघटन अधिक गतिमान आणि मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.



