राजन विजयकुमार भोसले यांची युवासेना भडगाव शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती.

युवाशक्तीला संघटित करून युवासेनेची ताकद वाढविण्याचा निर्धार
भडगाव : युवासेनेची भडगाव शहरातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने शहरातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून, राजन विजयकुमार भोसले यांची युवासेना भडगाव शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नियुक्तीनंतर राजन भोसले यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील तसेच नवनियुक्त जळगाव लोकसभा अध्यक्ष लखीचंद प्रकाश पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले. मिळालेली जबाबदारी ही केवळ पद नसून पक्षाच्या विचारांशी जोडलेली महत्त्वपूर्ण जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त करत भोसले म्हणाले, “माझ्यावर विश्वास दाखवून युवासेना भडगाव शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हा माझ्यासाठी सन्मान नसून एक मोठी जबाबदारी आहे. वरिष्ठांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रामाणिकपणे आणि पूर्ण ताकदीने काम करणार आहे.”
या नियुक्तीबद्दल त्यांनी शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, आमदार किशोर आप्पा पाटील, युवासेना जळगाव लोकसभा अध्यक्ष लखीचंद पाटील तसेच संपर्कप्रमुख निखिल चौधरी यांचे आभार व्यक्त केले.
भडगाव शहरातील युवकांना संघटित करून अधिकाधिक नव्या कार्यकर्त्यांना युवासेनेशी जोडणे, युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे आणि शहरातील युवासेनेची संघटनात्मक ताकद अधिक सक्षम करणे यासाठी आगामी काळात सक्रियपणे कार्य करणार असल्याचे राजन भोसले यांनी सांगितले.
दरम्यान, राजन विजयकुमार भोसले यांच्या नियुक्तीचे शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार तसेच समर्थकांकडून स्वागत करण्यात येत असून, त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




