Headlines

🛑 ब्रेकिंग: पैशासाठी आजीचा खून, घरातच जाळला मृतदेह, नातवाकडून अमानुष कृत्य

हॅलो जनता न्यूज, पाथर्डी (जि. अहिल्यानगर) : मानवी संवेदना काळाच्या पडद्याआड गेल्याचा थरकाप उडवणारा प्रकार पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे उघडकीस आला आहे. फक्त दोन गुंठे जागेच्या विक्रीतून मिळालेल्या पैशाच्या वादातून नातवानेच आपल्या ७५ वर्षीय आजीचा खून करून मृतदेह घरातच जाळल्याचा प्रकार उघड झाला आहे.

या प्रकरणात किसनबाई छगन मैंदड (वय ७५) या वृद्ध महिलेला त्यांच्या नातवाने सचिन सुरेश मैंदड (वय ३०, रा. माळवाडी, वडगाव गुप्ता, जि. अहिल्यानगर) याने निर्दयपणे ठार मारले असल्याचे तपासात समोर आले आहे.

पाथर्डी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किसनबाई यांच्या नावावर मिरी गावात दोन गुंठे जागा होती. ती जागा विक्री करून मिळालेल्या रकमेवरून आजी आणि नातवामध्ये वाद सुरू होता. पैशाचा हिस्सा न दिल्याचा राग मनात ठेवून सचिनने ६ मे २०२५ रोजी आजीचा खून करून मृतदेह पुरावा नष्ट करण्यासाठी घरातच जाळून टाकला.

आमच्या व्हॉट ग्रुप मधे जॉइन व्हा….

प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना या घटनेबाबत संशय आल्याने त्यांनी सखोल चौकशी केली. चौकशीत सचिनने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून हत्या, पुरावा नष्ट करणे आणि अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या अमानुष कृत्यामुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे. वृद्ध आजीला पैशासाठी ठार मारणाऱ्या नातवाच्या निर्दयतेबद्दल ग्रामस्थांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

🛑 ब्रेकिंग : निर्मल इंटरनॅशनल स्कूलची श्रेया महालपुरेची विभागीय कॅरम स्पर्धेसाठी निवड..

🏆 गाळण आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी

🛑 संताप जनक : मनसे आक्रमक, शाळेची फी भरली नाही म्हणून विद्यार्थी परीक्षेपासून वंचित

3,455Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION