Headlines

🏆 गाळण आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) – इतर मागास बहुजन कल्याण संचलित वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, गाळण बु. (ता. पाचोरा, जि. जळगाव) येथील अंडर-17 मुलांच्या कबड्डी संघाने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत शानदार विजय मिळवून विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे

फायनल सामन्यात गाळण आश्रम शाळेच्या खेळाडूंनी अपूर्व जिद्द, कौशल्य आणि टीमस्पिरिट दाखवत रावेर संघावर 55–31 असा विक्रमी फरकाने विजय मिळवला. या विजयाने शाळेचा तसेच पाचोरा तालुक्याचा अभिमान वाढविला आहे.

या यशाचे श्रेय खेळाडूंच्या अथक मेहनतीसोबतच प्रशिक्षक नंदा पाटील आणि वाल्मीक पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाला जाते. त्यांच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणामुळेच संघाने स्पर्धेत वर्चस्व गाजवले.

या विजयसोहळ्याला इतर मागास बहुजन कल्याण विभाग, जळगाव येथील सहाय्यक आयुक्त योगेश पाटील आणि विशाल राठोड यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. त्यांच्या प्रेरणादायी उपस्थितीमुळे खेळाडूंमध्ये नव्या जोमाने उत्साह संचारला. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक आणि ग्रामस्थांनी सर्व विजेत्या खेळाडूंना मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. विभागीय स्पर्धेसाठी या विजयी संघाला शुभेच्छा देत संपूर्ण परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

🛑 संताप जनक : मनसे आक्रमक, शाळेची फी भरली नाही म्हणून विद्यार्थी परीक्षेपासून वंचित

💥 ब्रेकिंग : 🚆 मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, दिवाळीत प्रवाशांना मिळणार दिलासा…

🚨 ब्रेकिंग : महाराष्ट्रातील पहिला उमेदवार जाहीर,भडगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिंदे सेना सज्ज

2,350Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION