💥 ब्रेकिंग गोळीबार प्रकरण भोवले, पाचोरा पोलीस निरीक्षकांची बदली

हॅलो जनता न्यूज, जळगाव :- अगोदरच तक्रारी अर्ज व त्यात भरदिवसा पाचोरा बसस्थानक परिसरात गोळीबार होऊन तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत पाचोरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक पवार यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी चाळीसगाव ग्रामीणचे प्रभारी पोलिस निरीक्षक राहुल पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यासंबंधीचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी शनिवारी काढले. निरीक्षक पवार यांच्या विरोधात अनेक तक्रारी देखील होत्या. त्यात शुक्रवारी पाचोरा बसस्थानक परिसरात झालेल्या गोळीबारात एकाचा खून झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी पवार यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या….
पाचोरा गोळीबार, पोलीस अधीक्षकांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम….
विद्यार्थ्यांनो! १२ वी कॉमर्स नंतर काय? हा कोर्स करा आणि हमखास नोकरी मिळवा…




