हॅलो राजकारण

VBA Jalgaon: वंचित बहुजन आघाडी कडून जळगाव लोकसभेसाठी पुन्हा उमेदवारी जाहीर

हॅलो जनता (जळगाव) – काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडी (VBA Jalgaon) कडून जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी प्रफुल लोढा यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र दोन दिवसानंतर जळगाव लोकसभा मतदारसंघात जिंकून येणार नाही असे कारण देत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच माघार घेतली होती. त्यानंतर वंचित बहुजन आघाडी जळगाव लोकसभा मतदारसंघात नवीन उमेदवार देणार का यासंदर्भात चर्चा सुरू होत्या आता त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

VBA Jalgaon : युवराज जाधवांना उमेदवारी जाहीर

जळगाव लोकसभा मतदारसंघातून युवराज भीमराव जाधव यांना वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. युवराज जाधव हे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष आहेत. त्यांनी अनेक पक्षांचे महत्त्वाच्या पदांवर जबाबदारी देखील निभावली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

MVA Jalgaon : महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांनी आई एकविरा मातेचे दर्शन, मातेला घातले साकडे…

Big Breaking : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, निवडक पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक सूरू

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button