हॅलो जनता न्यूज, पाचोरा – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला पाचोऱ्यात मोठा धक्का बसला आहे. पाचोरा तालुक्यातील गाळण येथील माजी पंचायत समिती सदस्य डॉ. पी. एन. पाटील यांनी आज शिंदेच्या सेनेत प्रवेश केला. हा प्रवेश कार्यक्रम आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.

आमदार किशोर पाटील यांनी गेल्या काही वर्षांपासून मतदारसंघात विविध विकासकामे केली असून त्यावर विश्वास दाखवत डॉ. पाटील यांनी पक्षांतराचा निर्णय घेतल्याचे सांगितले. प्रवेश सोहळ्यावेळी गाळण गावातील शेकडो नागरिकांनी देखील शिंदे गटात प्रवेश करून आपला पाठिंबा जाहीर केला.
अनेक वर्षांपासून पाटील राष्ट्रवादीशी होते एकनिष्ठ…
डॉ. पी. एन. पाटील हे मागील पंचायत समितीची निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले असून त्यांचे शरद पवारांशी घरोब्याचे संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रसंगी बोलताना डॉ. पी. एन. पाटील म्हणाले, “गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्याची संधी शिंदेच्या शिवसेनेत मिळू शकते. आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात झालेले काम डोळ्यासमोर आहे. त्यांच्याबरोबर राहून गाळण गावाचा व परिसराचा विकास वेगाने करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
या प्रवेशामुळे पाचोरा तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गाळण गाव व परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांचा झालेला प्रवेश शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात असून आगामी निवडणुकांचे चित्र बदलणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या….
💥 ब्रेकिंग : पाचोरा शेतकरी अनुदान घोटाळा, प्रशासन ॲक्शन मोडवर….
💥 ब्रेकिंग : चाळीसगाव हादरले ! अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, अत्याचाराचा व्हिडिओ वायरल..
💥विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र प्रशाळेतील विद्यार्थिनी नेहा मालपुरे सेट परीक्षा उत्तीर्ण
