हॅलो राजकारण

MVA Pachora : करणदादा यांच्या प्रचारासाठी अंजलीताई उतरल्या मैदानात; पाचोरेकरांना घातली मतदानासाठी साद

पाचोरा : महाविकास आघाडीचे (MVA Pachora)  जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांच्या प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. उन्हातान्हाची परवा न करता नेतेमंडळी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते गावा-गावात, घरोघरी जावून प्रचार करीत असतांना आता करणदादा पाटील यांच्या पत्नी अंजलीताई पाटील या देखील प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत. गुरुवार, २ रोजी पाचोरा शहरातून काढण्यात प्रचार रॅलीत त्यांनी सहभागी होत पाचोरेकरांना मतदानासाठी साद घातली.

शिवसेनेचे उमेदवार करणदादा पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून जळगाव लोकसभा मतदार संघातील महाविकास विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्वच घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते गावागावात जावून घराघरापर्यंत पोहचून मशाल हे चिन्ह त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत. करणदादा पाटील हे देखील स्वतः जनतेपर्यंत पोहचत आहेत. आता त्यांच्या पत्नी अंजलीताई पाटील या देखील प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत. गुरवारी त्यांनी पाचोरा-भडगावच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्यासाथीने पाचोरा शहरातील विविध भागात जावून ‘मशाल’ चिन्हा समोरील बटन दाबून करणदादा पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

 

 

MVA Pachora पाचोरा शहरातील शिवसेना कार्यालयासमोरील म्हसोबा महाराज मंदिरात नारळ ओवाळून प्रचाराला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक, रेल्वे स्टेशन परिसर, चौधरी वाडा, बाहेरपुरा, मच्छी बाजार, आठवडे बाजार, रथ गल्ली, गांधी चौक, जामनेर रोड, स्व. के. एम. पाटील व्यापारी संकुल, श्री. महावीर शॉपिंग कॉम्प्लेक्स, मानसिंगका कॉर्नर, गणेश प्लाझा मार्गे पुन्हा शिवसेना कार्यालय येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

 

रॅलीत शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई सुर्यवंशी, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, नगरसेवक भैय्या चौधरी, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस भिकन आहीरे, किशोर वानखेडे, पिंटू वानखेडे, भूषण वानखेडे, विशाल वानखेडे, चंदू मिस्तारी, अतुल मराठे, विशाल महाजन, कामगार सेनाचे माजी जिल्हाध्यक्ष हेमंत विसपुते, प्रकाश पाटील, आनंदा पाटील, विनोद पाटील, बापूसाहेब पाटील, विभाग प्रमुख आप्पा महाजन, दादाभाऊ पाटील, युवासेनेचे उप तालुकाध्यक्ष सागर पाटील, एकनाथ अहिरे, देविदास पाटील, बापू पाटील,

माजी सभापती तथा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख उद्धव मराठे, जिल्हाप्रमुख दीपकभाऊ राजपूत, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, पाचोरा तालुका प्रमुख शरद पाटील, शशी पाटील, उपतालुका प्रमुख ज्ञानेश्वर चौधरी, पाचोरा शहरप्रमुख अनिल सावंत, मिथुन वाघ, राजू काळे, पप्पू राजपूत, इमरान पिंजारी, ललित वाघ, मुरान तडवी, प्रदिप वाघ, शरद पाटील, विक्रांत पाटील, बातसरचे माजी उपसरपंच धर्मराज पाटील, जिल्हा सरचिटणीस विनोद पाटील, यशवंत पवार, भाऊसाहेब पाटील, अण्णा पाटील, बाळू पाटील यांसह शेकडो, कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar Public meeting : खडसेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची जाहीर सभा, 3 मे रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर….

Yogi Adityanath : या निवडणुकीनंतर काँग्रेस इतिहास जमा होणार – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button