Headlines

🚨 ब्रेकिंग : सामाजिक कार्यकर्त्या कोमल वाढे प्रभाग क्र. ६ मधून जळगाव मनपा निवडणुकीच्या रिंगणात

हॅलो जनता न्यूज, जळगाव – महापालिकेच्या आगामी निवडणुकीत खानदेश मिल्क कॉलनी, डॉ. सहस्रबुद्धे गल्ली, शाहूनगर येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्त्या कोमल प्रमोद वाढे या वार्ड क्रमांक ६ मधून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या तीन दशकांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या कोमल वाढे या महिलांच्या स्वावलंबनासाठी सातत्याने काम करत आहेत.

कोमल वाढे या व्यवसायाने ब्युटीशियन असून त्यांना ३० वर्षांचा व्यावसायिक अनुभव आहे. या काळात त्यांनी केवळ स्वतःचा व्यवसाय उभारला नाही, तर असंख्य महिलांना स्वावलंबी होण्यासाठी मार्गदर्शन केले. बचत गटांची माहिती देऊन अनेक महिलांना बचत गट सुरू करण्यास प्रवृत्त केले. आज त्या महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहून कुटुंबाचा आधार बनल्या आहेत.

घरबसल्या व्यवसाय कसा सुरू करायचा, याबाबत त्यांनी महिलांना सखोल मार्गदर्शन केले. पापड, कुरडया, लोणची, चटण्या, मसाले तयार करून विक्री करणे, घरगुती पापड व्यवसाय, साडी-ड्रेस मटेरियल विक्री, ज्वेलरी बनवणे, रांगोळी, गालिचे, मोत्यांचे हार, फुलवाती आदी लहान-मोठ्या उद्योगांची माहिती देत त्यांनी अनेक महिलांना रोजगाराच्या वाटा खुल्या करून दिल्या. कमी भांडवलातून हळूहळू व्यवसाय वाढवून आज त्या महिला समाधानी आणि आनंदी जीवन जगत आहेत.

जळगाव : कोरोना काळातही मदतीचा हात

कोरोना महामारीच्या कठीण काळात सौ. कोमल वाढे यांनी गरजू महिलांना आणि कुटुंबांना किराणा धान्य व आवश्यक वस्तूंची मदत केली. संकटाच्या काळात त्यांनी अनेक ठिकाणी सामाजिक जबाबदारी जपली. महिलांना सेल्फ मेकअप शिकवून दोन पैसे कमविण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. आज अनेक महिला छोटे-मोठे मेकअप करून आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या असून, “ताईंनी खूप छान शिकवलं, योग्य मार्गदर्शन केलं” अशी भावना त्या व्यक्त करत आहेत. या माध्यमातून महिलांनी घरखर्चात हातभार लावण्यास सुरुवात केली आहे.

सौ. कोमल वाढे नेहमी महिलांशी संवाद साधत त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होतात. कमी शिक्षण किंवा शिक्षणाचा अभाव असल्यामुळे आपण काही करू शकत नाही, अशी भीती अनेक महिलांच्या मनात असते. मात्र, “शिक्षण नसले तरी कौशल्य, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर घरी बसूनही व्यवसाय करता येतो. प्रत्येक स्त्रीमध्ये देवाने दिलेली बुद्धिमत्ता असते; डोकं म्हणजे कॅम्प्युटरसारखंच आहे,” असा आत्मविश्वास त्या महिलांमध्ये निर्माण करतात.

आज ५० ते ६० पेक्षा अधिक महिला घरबसल्या साडी-ड्रेस मटेरियल व्यवसाय, ज्वेलरी बनवणे, रांगोळी, मेहंदी क्लास, मोत्यांचे हार, फुलांचे नेकलेस, बिंदी सेट, नवरीसाठी लागणारे साहित्य तयार करून विक्री करत आहेत. या महिलांच्या आर्थिक स्वावलंबनात सौ. कोमल वाढे यांचे मोलाचे योगदान आहे. महिलांच्या सबलीकरणासाठी केलेल्या या प्रदीर्घ सामाजिक कार्याच्या बळावर सौ. कोमल प्रमोद वाढे जळगाव महापालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत असून, “महिला, कुटुंब आणि परिसराचा सर्वांगीण विकास” हा त्यांचा प्रमुख अजेंडा असणार असल्याचे सांगितले जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

🚨 ब्रेकिंग : पाचोरा शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत, पाच जणांना चावा तीन गंभीर…

🚨 ब्रेकिंग : आमदार किशोर पाटील यांचा भडगावच्या विकासासाठी मास्टरस्ट्रोक, उपनगराध्यक्ष पदी राजेंद्र पाटील….

भडगावच्या राजकारणात ‘रेखाताईं’चा नवा अध्याय ; हिंद लोक चळवळीच्या वतीने जाहीर सत्कार.

5,211Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION