MVA Jalgaon : महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांनी आई एकविरा मातेचे दर्शन, मातेला घातले साकडे…
हॅलो जनता (जळगाव) – जळगाव तालुक्यातील आमोदा गावाच्या ग्रामदैवत आदिशक्ती एकविरा मातेचा यात्रोत्सवाला आज पासून सुरूवात झाली आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज खासदार उन्मेष पाटील आणि महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभेचे (MVA Jalgaon) उमेदवार करण पवार यांच्यासह यात्रोत्सवात सहभागी होवून आई एकविरा मातेचे दर्शन घेतले.
आज पहाटे ४ वाजता गावातून एकवीरा मातेची भव्य अशी पालखी मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीत आपल्या समर्थकांसह करण पवार सहभागी होत ठेका धरला. पालखी आदिशक्ती एकविरा मातेच्या मंदिरावर पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी करण पवारांच्या हस्ते महाआरती देखील करण्यात आली.
MVA Jalgaon : आदिशक्ती एकविरा मातेला घातले साकडे...
यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांनी आदिशक्ती एकविरा मातेचे दर्शन घेत बळी राजाचे राज्य येवू दे असे साकडे घातले. यावेळी उपस्थित सर्वांनी आगामी लोकसभा निवडणुकीत करण पवार विजय होतील असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जळगाव तालुका उपसंघटक शरद पाटील, सरपंच विजय सुर्यवंशी, उपसरपंच सुनंदा सुर्यवंशी, माजी सरपंच विकास सुर्यवंशी यांसह आई एकविरा मित्र मंडळ, आई एकविरा भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, वा. जे. ग्रुप, श्री. स्वामी समर्थ ग्रुप, जय गुरूदेव परिवार, एकलव्य ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नेरी येथील जनता विद्यालयात रंगला गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा