Loksabha Election : विदर्भातील पाच मतदारसंघांत मतदानाला सुरवात, सकाळपासून मतदारांमध्ये उत्साह…
हॅलो जनता (महाराष्ट्र) : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला आज सुरुवात झाली असून सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळत असून एक मोठा उत्साह मतदारांमध्ये पाहायला मिळत आहे. आज १९ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी ९७ उमेदवार रिंगणात आहेत.
काही दिवसांपासून प्रचार सभांमधून उडालेला धुरळा आता शांत झाला असून, आज प्रत्यक्ष उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या परिश्रमाची कसोटी लागणार आहे. पाचही मतदारसंघ विदर्भातील असून प्रामुख्याने नागपूर, रामटेक आणि चंद्रपूर येथील लढतींकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. गडचिरोली-चिमूर व भंडारा-गोंदियातील नक्षलग्रस्त मतदान केंद्रावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Loksabha Election : संवेदनशील भागात पोलिस प्रशासन सज्ज
पूर्व विदर्भातील पाचपैकी भंडारा-गोंदिया व गडचिरोली-चिमूर हे लोकसभा मतदारसंघ नक्षलग्रस्त भागात येत असल्याने पोलिस प्रशासनाने त्याठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी हेलिकॉप्टरही सज्ज ठेवण्यात आले.
VBA Jalgaon : ‘या’ कारणामुळे निवडणुकीपूर्वी जळगावतुन वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने घेतली माघार