Headlines

🛑 ब्रेकिंग : पाचोरा भडगाव मतदार संघातील आणखी एक विरोधक भाजपच्या गळाला, आज मुंबई येथे प्रवेश सोहळा….

हॅलो जनता न्यूज, भडगाव प्रतिनिधी – भडगाव तालुक्यातील शिंदे सेनेला मोठा धक्का बसला असून शिक्षण महर्षी म्हणून ओळखले जाणारे प्रताप हरी पाटील हे लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही वेळातच मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडणार असून, या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदा मंत्री…

Read Full News

🛑 पाचोऱ्यात ईद मिलाद उत्साहात साजरी : महाविकास आघाडीकडून अनोखे स्वागत

हॅलो जनता न्यूज, पाचोरा : पाचोरा शहरात ईद मिलाद-उन-नबीचा उत्सव मोठ्या उत्साहात व ऐक्याचे दर्शन घडवत साजरा करण्यात आला. पाचोरा शहरातील प्रमुख मार्गावरून मुस्लिम बांधवांनी आज दिमाखदार मिरवणूक काढली. या मिरवणुकीत विविध सामाजिक, धार्मिक संघटनांनी सहभाग घेतला. मिरवणुकीचा मार्ग शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून गेला असता महाविकास आघाडीच्या वतीने फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून ऐक्य व…

Read Full News

पाचोऱ्यात गणेशोत्सवाचा जल्लोष, आमदार किशोर पाटील यांचे बाप्पाला साकडे.

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात यंदाच्या गणेशोत्सवात आमदार किशोर आप्पा पाटील यांचे चिरंजीव सुमित किशोर पाटील यांनी उज्जैन येथील महाकाल मंदिराच्या प्रतिकृतीचा अत्यंत देखणा व आकर्षक देखावा उभारला होता. दरवर्षी वेगवेगळ्या नामांकित तीर्थक्षेत्रांचे देखावे तयार करण्याची परंपरा असल्याने पाचोऱ्यातील गणेश मंडळांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. या देखाव्याला शहरातील भाविकांनी मोठ्या संख्येने…

Read Full News

💥 ब्रेकिंग : ११ वर्षात पहिल्यांदा डाग लागला, उद्घाटन कार्यक्रमात आमदारांनी व्यक्त केली खंत…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा प्रतिनिधी – पाचोरा तहसीलदारांनी नव्या दालनाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना योग्य तो न्याय द्यावा अशी अपेक्षा आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केली. पाचोरा तहसील कार्यालयातील तहसीलदारांच्या दालनाचे उद्घाटन आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी आमदार पाटील यांनी आपल्या मनोगतातून तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्यासह सर्व शासकीय अधिकाऱ्यांचे कौतुक…

Read Full News
ठाकरे सेना

💥 ब्रेकिंग : पाचोऱ्यात ठाकरेंची सेना डॅमेज कंट्रोल करणार, आगामी निवडणुकांची रणनीती ठरली….

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा तालुक्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची प्रमुख पदाधिकारी व निष्ठावंत शिवसैनिकांची आढावा बैठक नुकतीच पाचोर्‍यातील शिवसेना संपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली. आगामी निवडणुकांच्या अगोदर ठाकरेंची सेना घेणार भव्य मेळावा… या बैठकीत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांच्या निष्ठेच्या जोरावर मतदारसंघात भव्य अशा निष्ठावंत शिवसैनिकांचा…

Read Full News

💥 ब्रेकिंग : पाचोरा शेतकरी अनुदान घोटाळा, प्रशासन ॲक्शन मोडवर….

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा तहसीलदार कार्यालयातील लिपिक अमोल सुरेश भोई याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांऐवजी मित्रांसह विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम वर्ग केल्याचा प्रकार चौकशीदरम्यान उघड झाला आहे. पाचोरा तहसीलदारांनी अनुदानाच्या रकमेची वसुली सुरु केल्यानंतर हे उघड झाले आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी भोई याला तडकाफडकी निलंबित केले आहे. असा आहे पाचोरा अनुदान घोटाळा… नैसर्गिक आपत्ती निधीच्या…

Read Full News

💥 ब्रेकिंग : पैसा किंवा खुर्चीसाठी मी पक्ष सोडला नाही, वैशाली सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत केला खुलासा…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (गजानन गिरी) – ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपल्या निर्णयामागील कारणे स्पष्ट केली. या वेळी माजी आमदार दिलीप वाघ, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वैशाली सूर्यवंशी म्हणाल्या की, “पैसा किंवा…

Read Full News

💥ब्रेकिंग : गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलचा विजयाचा श्रीगणेशा: अक्षिता शेख तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत विजयी

हॅलो जनता न्यूज, 📍 पाचोरा (प्रतिनिधी) –  पाचोरा तालुक्यात दिनांक ५ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झालेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनी अक्षिता शेख हिने वयोगट १७ कॅरम स्पर्धेत शानदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशामुळे तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, शाळेच्या यशाचा श्रीगणेशा अक्षिताने साधला आहे. तालुकास्तरावर झालेल्या…

Read Full News

💥 ब्रेकिंग : जिल्हा परिषद शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप, स्व. शांताबाई पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ उपक्रम

हॅलो जनता न्यूज, गाळण (ता. पाचोरा) – पाचोरा तालुक्यातील गाळण गावातील पाटील कुटुंबियांचा अनोख्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. जिल्हा परिषद शाळा विष्णुनगर गाळण बुद्रुक व गाळण खुर्द येथे एक प्रेरणादायी व सामाजिक भान जागवणारा उपक्रम राबविण्यात आला. स्व. शांताबाई पांडुरंग पाटील यांच्या पवित्र स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे पुत्र अर्जुन पाटील, पोपट पाटील व मॉर्निंग ग्रुप चे…

Read Full News
माजी सैनिकाने पत्नीची हत्या करून तिचे शरीर प्रेशर कुकरमध्ये शिजवले

💥 ब्रेकींग : पाचोरा हादरले, चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीचा गळा चिरून खून

हॅलो जनता न्यूज, पाचोरा | २० जुलै २०२५ – पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना आज (शनिवार) पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. मयत महिलेचे नाव प्रियंका भदाणे (वय २५) असे असून, आरोपी पती पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोघेही जारगाव येथील श्रीकृष्ण हौसिंग सोसायटी मध्ये आपल्या…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION