Santosh Deshmukh Case : मी राजीनामा देण्याची गरज नाही – धनंजय मुंडे
हॅलो जनता न्युज, मुंबई :
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड पुणे सीआयडीकडे शरण आले आहेत. वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे व्यक्ती असल्याने तपासावर प्रभाव पडू शकतो, असा आरोप विरोधक करत आहेत. विरोधकांच्या या मागणीला उत्तर देताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी ही मागणी केली आहे की, तपास सुरू होईपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा.
मात्र, आज मंत्रिमंडळ बैठकीला आले असताना, मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले की, दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे राजीनाम्याची आवश्यकता नाही. ते म्हणाले, “हत्येचा तपास सीआयडीच्या कडे असल्यामुळे, मी राजीनामा देण्याची गरज नाही.”
संतोष देशमुख यांची हत्या ९ डिसेंबर रोजी झाली होती, आणि त्यानंतर २२ दिवसांनी आरोपी वाल्मिक कराड पुणे सीआयडीकडे शरण आले. या प्रकरणात चौघा आरोपींना अटक करण्यात आले आहे, तर तीन आरोपी फरार आहेत. वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याने, तपास पूर्ण होईपर्यंत मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक करत आहेत. यावर उत्तर देताना, धनंजय मुंडे म्हणाले की, “हे प्रकरण सीआयडीकडे आहे आणि तपास सुरू आहे. मी फास्ट ट्रॅक कोर्टात हा प्रकरण न्यायालयात लवकर न्याय मिळावा, अशी मागणी केली होती. त्यामुळे राजीनाम्याची काही गरज नाही.”
Santosh Deshmukh Case : फास्ट ट्रॅक कोर्टात जलद सुनावणीची ग्वाही
कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावर भाष्य करताना म्हटले की, “मोठ्या आकालाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचे एन्काऊंटर होईल.” यावर मुंडे म्हणाले, “विजय वडेट्टीवार हे बोलायला हुशार आहेत, पण छोटा आका, मोठा आका आणि एन्काऊंटर अशी भाषा मी पहिल्यांदाच ऐकली आहे. हत्येचे आरोपी लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून फाशी मिळवावी, हीच आमची प्राथमिकता आहे.” मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टात जलद सुनावणी होईल, अशी आपली मागणी पुन्हा एकदा व्यक्त केली आणि आरोप्यांना जलद फाशी मिळवण्यासाठी योग्य कारवाई होईल, असा विश्वास व्यक्त केला.
Jalgaon MIDC : चटई कंपनीला लागलेल्या आगीत 100 टनापेक्षा जास्त प्लास्टिक साहित्य खाक
Beed : “सरपंच हत्या प्रकरण : फरार आरोपींना अटक नाही तर महाराष्ट्र बंद – मनोज जरांगे यांचा इशारा