Headlines

🚨 ब्रेकिंग : ग. स. सोसायटीची भरती प्रक्रिया एजन्सी मार्फत करावी – आमदार चंद्रकांत पाटील

हॅलो जनता न्यूज, जळगाव – जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी, म्हणजेच ग. स. सोसायटीची प्रस्तावित नोकरभरती आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या भरती प्रक्रियेत अनियमितता आणि भ्रष्टाचाराची भीती व्यक्त करत आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट जिल्हा उपनिबंधकांना निवेदनाद्वारे दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. आमदार पाटील यांनी दिलेल्या निवेदनात संस्थेतील सभासद संख्येतील मोठी तफावतीचे कारण दिले आहे.

संस्थेतील अंदाजे ९ ते १० हजार सेवानिवृत्त सभासदांचे सदस्यत्व कमी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे, आजची सदस्य संख्या पाहता सध्या नोकरभरती करणे योग्य नाही. ही नोकरभरती प्रक्रिया पूर्णपणे रद्द करावी किंवा भरती प्रक्रिया अपरिहार्य असल्यास ती निष्पक्षपातीपणे आणि भ्रष्टाचारमुक्त होण्यासाठी नामांकित एजन्सीमार्फत राबवावी, अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी निवेदनात केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या…

🚨 ब्रेकिंग : धरणगाव येथील पर्यटकांचा उत्तर प्रदेशात अपघात, एका प्रवाशाचा मृत्यू…

🚨 ब्रेकिंग : महापालिका निवडणुकीचा बिगुल डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात

🚨 ब्रेकिंग : भाजपाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार साधना चौधरी यांनी बजावला मतदानाचा हक्क…

4,702Popular Reads (Illustrative)
हॅलो जनताही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Designed & Developed by SM SOLUTION