Jalgaon MIDC : चटई कंपनीला लागलेल्या आगीत 100 टनापेक्षा जास्त प्लास्टिक साहित्य खाक
या जळालेल्या आगीत प्लास्टिकची 2 किलोमीटरपर्यंत दुर्गंधी
हॅलो जनता न्युज, जळगाव:
एमआयडीसीतील (Jalgaon MIDC) डी-सेक्टरमधील चटई कंपनीला रविवारी लागलेल्या भीषण आगीत शंभर टनापेक्षा जास्त प्लास्टिक साहित्य जळाले आहे. कंपनीचे मूळ मालक केतन चंद्रकांत राणे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आगीबाबत दिलेल्या तक्रारीत याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, या आगीमध्ये जळालेल्या प्लास्टिकची दुर्गंधी दोन किलोमीटर अंतरापर्यंत येते आहे.
Jalgaon MIDC : श्वास घेण्यास त्रास
राणे यांच्या तक्रारीनुसार आगीत ४० ते ५० टन चटई बनवण्याचे कच्चे मटेरीयल, ३५ ते ४० टन चटईसाठी लागणारा प्लास्टिकचा दाणा, चटई निर्मितीच्या प्रोसेसमध्ये असलेल्या ८ ते १० तसेच ८० ते ९० हजार तयार चटई आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. त्यासोबतच चटई बनवण्यासाठी असलेल्या ३२ लूम मशीन, एक दाणा बनवण्याची मशीन, एक स्टुलर मशीन, तीन मिक्सर मशीन जळून खाक झाल्या. दरम्यान, कंपनीत जळालेल्या प्लास्टिकमुळे परिसरात श्वास घेण्याचा त्रास जाणवू लागला आहे. राणे यांचा मित्र उन्मेष चौधरी यांच्या शेतातून काढलेल्या सूर्यफुलाच्या बियांचे ३० ते ४० कट्टे आगीत जळून खाक झाल्याचे राणे यांनी तक्रारीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक राहुल तायडे हे पुढील तपास करीत आहेत.
Beed : “सरपंच हत्या प्रकरण : फरार आरोपींना अटक नाही तर महाराष्ट्र बंद – मनोज जरांगे यांचा इशारा
Jalgaon Crime : घरमालकांच्या विश्वासाला तडा: मोलकरणीने २० लाखांची चोरी करून घेतले फ्लॅट व दुचाकी