chhava movie : राज ठाकरेंच्या भेटीनंतर ‘छावा’ दिग्दर्शकांचा महत्त्वपूर्ण निर्णय

हॅलो जनता न्यूज, मुंबई :
‘छावा’ (chhava movie) या चित्रपटातील वादग्रस्त दृश्याच्या संदर्भात दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर त्यांनी चित्रपटाच्या बाबतीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्या दृश्यात असलेल्या लेझीम नृत्याचे सीन्स चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय उतेकर यांनी घेतला आहे. याबाबत ते म्हणाले, “आम्हाला राज ठाकरेंच्या मार्गदर्शनाची आवश्यकता होती. त्यांचा इतिहासाबद्दलचा सखोल अभ्यास आणि ज्ञान खूप महत्त्वपूर्ण आहे. ते छत्रपती महाराजांविषयी खूप वाचले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून या चित्रपटात काय बदल करावे, हे जाणून घेतले. चर्चेदरम्यान त्यांनी काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या, ज्यामुळे आम्हाला योग्य दिशा मिळाली.”
उतेकर यांनी यावेळी स्पष्ट केले की, ‘छावा’ (chhava movie) या चित्रपटातील लेझीम नृत्याच्या त्या दृश्यावरून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास, त्याचे कारण असो किंवा नसो, त्यांना ते काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. “ते दृश्य चित्रपटाच्या मुख्य भागाचा एक लहान भाग आहे, आणि त्याचा संपूर्ण चित्रपटावर विशेष परिणाम होणार नाही. त्यामुळे आम्ही ते दृश्य काढून टाकणार आहोत,” असे ते म्हणाले.
चित्रपटाच्या संकलनाच्या आणि ऐतिहासिक संदर्भाच्या बाबतीत उतेकर यांनी सांगितले की, त्यांची संपूर्ण टीम चार वर्षांपासून या चित्रपटावर संशोधन करत आहे. “हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या महानतेचा आणि त्यांच्या युद्धकौशल्याचा आदर व्यक्त करण्यासाठी बनवला आहे. जर काही दृश्यांनी त्या उद्देशाला धक्का पोहोचवला असेल, तर आम्ही त्यांना काढून टाकण्यास तयार आहोत,” असे ते म्हणाले. त्यांनी चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी इतिहासकारांच्या सल्ल्याची आणि मते घेण्याची योजना मांडली आहे.
तायक्वांडोपटू पुष्पक रमेश महाजन “गुणवंत खेळाडू पुरस्कार” ने सन्मानित
ब्रेकिंग : ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडली, खोकल्याचा त्रास वाढला…
“उच्च शिक्षणात नवीन बदलांची नांदी ठरेल यूजीसी मसुदा – 2025” -अभिजित भांडारकर