उद्योगाप्रति व आरोग्याप्रति महिलांनी जागरूक राहणे ही काळजी गरज ; हळदी कुंकु कार्यक्रमात उद्योजक तानाजी शेटे यांचे मत

हॅलो जनता न्यूज :
जयभवानीनगर येथील राधाकृष्ण विद्यालयात 26 जानेवारी रोजी आयोजित हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन विश्वकर्मा वंशीय समाज संघटन महिला आघाडीने केले होते. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून भाजपा महिला अध्यक्ष मनीषाताई मुंडे, मराठवाडा विश्वकर्मा समाज संघटनेच्या विभागीय अध्यक्ष सौ. वनिताताई चाफेकर, विधी तज्ञ सौ. शिल्पाताई शेरखाने, शिवसेना नेत्या सुकण्याताई भोसले यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेल्या प्रसिद्ध मोटिव्हेटर आणि उद्योजक तानाजी शेटे यांनी महिलांना उद्योग आणि आरोग्याबाबत जागरूक होण्याचे महत्त्व सांगितले. त्यांनी कार्यक्रमात महिलांना संबोधित करत सांगितले, “आजच्या काळात महिलांनी केवळ घरकामापुरते न थांबता, उद्योग आणि आरोग्याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. सिक्रोमेक कंपनीच्या माध्यमातून महिलांसाठी गृहउद्योग करण्यासाठी विविध साधने तयार केली जात आहेत. महिलांनी बचत गटांद्वारे आणि शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेऊन स्वतःला उद्योजिका बनवण्याचे प्रयत्न करावेत.” तानाजी शेटे यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आयोजित या कार्यक्रमाचे कौतुक करत, महिलांना आत्मविश्वासाने उद्योग आणि आरोग्याच्या क्षेत्रात एक पाऊल पुढे जाण्याची प्रेरणा दिली.
कार्यक्रमात आमदार आणि मंत्री सौ. मेघना ताई बोर्डीकर यांनी महिलांना राजकारणात सक्रिय होण्याचे आव्हान केले आणि समृद्ध परिवार निर्माण करण्यासाठी महिलांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. तसेच, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष सौ. मनीषा मुंडे यांनी महिलांना आरोग्य जपण्याचे महत्त्व सांगितले आणि रोज व्यायाम करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमातील इतर प्रमुख घटक: कार्यक्रमात विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते, जसे की ‘संगीत खुर्ची’, ‘होम मिनिस्टर’ आणि इतर अतरंगी खेळ. या खेळांचे संयोजन लाडके भाऊजी संतोष भांडेकर यांनी केले, तर सूत्रसंचालन विलास पवार यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पूजा भालेकर, अनिता राऊत, दिपाली सपकाळ, प्रमिला सोनवणे, मंदा खोलगडे, पूजा गाडेकर, रूपाली हिवाळे, दिपाली पांचाळ, लक्ष्मी कामोदे, पद्मावती पांचाळ, सुरेखा भांडेकर, गीता घुसळकर, सुरेखा सोनवणे आणि वैष्णवी राऊत यांचे विशेष योगदान होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना एक सकारात्मक दिशा दाखवली गेली आणि त्यांना सामाजिक, आर्थिक, आणि मानसिक दृष्टिकोनातून सक्षम बनवण्याची प्रेरणा मिळाली.
chhava movie : राज ठाकरेंच्या भेटीनंतर ‘छावा’ दिग्दर्शकांचा महत्त्वपूर्ण निर्णय
Anjali Damaniya : अंजली दमानियांचे डॉ. अशोक थोरात आणि वाल्मिक कराडविरोधात खळबळजनक आरोप