Jalgaon Fraud : जळगाव शहरातील डॉक्टराची फसवणूक ; काय आहे प्रकरण ?
हॅलो जनता न्युज, जळगाव :
जळगाव शहरातील (Jalgaon Fraud) गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ स्थित डॉ. के.डी. पाटील यांच्या हॉस्पिटलच्या लोखंडी भंगाराच्या विक्रीसंबंधी एक गंभीर फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. १.१५ लाख रुपयांच्या मोबदल्यात भंगार विकत घेतल्याचा दावा करणाऱ्याने पैसे न दिल्याने आणि हॉस्पिटलचे फॅब्रिकेशन काम न केल्यामुळे अखेर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हा प्रकरण १५ ते २१ ऑक्टोबर २०२४ च्या दरम्यान घडला. डॉ. अनुज पाटील, जो डॉ. के.डी. पाटील यांचे हॉस्पिटल चालवतात, यांनी संदीप साहेबराव पाटील (रा. रेणूका नगर, जळगाव) यांना त्यांच्याकडे असलेले लोखंडी भंगार १.१५ लाख रुपयांच्या मोबदल्यात विकले होते. त्याचबरोबर फॅब्रिकेशनच्या कामाचे ठेके देखील दिले होते.
Jalgaon Fraud : फसवणुकीचा गुन्हा दाखल
परंतु, संदीप पाटील यांनी न फक्त भंगारासाठी पैसे दिले नाहीत, तर फॅब्रिकेशनचे कामही केले नाही. यामुळे डॉ. अनुज पाटील यांनी अखेर ४ जानेवारी २०२५ रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार, संदीप साहेबराव पाटील याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पाटील हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
Santosh Deshmukh Case : मी राजीनामा देण्याची गरज नाही – धनंजय मुंडे
Santosh Deshmukh : बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्येची गुऱ्हाळ; तपासासाठी स्थापन केली एसआयटी
Jalgaon MIDC : चटई कंपनीला लागलेल्या आगीत 100 टनापेक्षा जास्त प्लास्टिक साहित्य खाक