राज्यातील अनेक अधिकारी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी चौकशीच्या रडारवर, दोन जिल्हाधिकाऱ्यांसह ४०० अधिकाऱ्यांची यादी…
हॅलो जनता, प्रतिनिधी – प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी (IAS) पूजा खेडकर हिचे बिंग फुटल्यानंतर सुरू झालेली चौकशी राज्यातील अनेक अधिकाऱ्यांना भोवण्याची चिन्हे दिसत आहेत. सध्या राज्यातील एक कृषी उपसंचालक बोगस दिव्यांग प्रमाणपत्र चौकशीच्या रडारवर आहे. याशिवाय, एका “आरटीओ”सह आणखी ३५९ सरकारी अधिकारी पूजा खेडकरच्याच धर्तीवर गोत्यात येण्याची शक्यता आहे. खेडकर प्रकरणानंतर राज्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र चौकशी सुरू…
