Headlines

Rupali Chakankar : लग्नपूर्व समुपदेशन काळाची गरज ; प्रत्येक जिल्ह्यात समुपदेशन कक्ष होण्यासाठी करणार प्रयत्न – राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर

हॅलो जनता, जळगाव : लग्न झाल्यानंतर थोडया थोड्या गोष्टीतून भांडणे होऊन त्याचे रूपांतर घटस्फ़ोटात होते. घटस्फ़ोट होणे दोघांसाठीही क्लेशदायक असतो. हे टाळण्यासाठी लग्नपूर्व समुपदेशन होणे अत्यंत गरजेचे आहे.त्यामुळे असे समुपदेशन कक्ष जिल्हा स्तरावर होण्यासाठी आपले शासनस्तरावर प्रयत्न सुरु असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिली. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हा…

Read Full News

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव

हॅलो जनता, मुंबई : जागतिक कृषी पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या शाश्वत शेतीच्या प्रयत्नांवर जगाने मोहोर उमटवली आहे. महाराष्ट्राने नेहमीचे भारतातील कृषी क्षेत्रात प्रयोगशीलता राबवल्याचे या पुरस्कारामुळे सिद्ध झाले, अशा शब्दांत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना प्रदान करण्यात आलेल्या जागतिक कृषी पुरस्कारांबद्दल कौतुकोद्गार काढले आहेत. पर्यावरण रक्षण, शाश्वत विकास आणि हरित…

Read Full News

मेंढपाळ कुटुंबातील ११ वर्षीय मुलाला सर्पदंश, संदीप सावळे यांच्या तत्काळ मदतीने वाचले प्राण

हॅलो जनता, रावेर – अहीरवाडी शेती शिवारातील एका मेंढपाळ कुटुंबात राहणाऱ्या ११ वर्षीय डिगंबर कोळपे याला साप चावल्याची घटना घडली. याची माहिती मिळताच संदीप सावळे यांनी तातडीने मदत करत त्याला रावेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घटनेच्या वेळी सकाळी दहाच्या सुमारास डिगंबर आपल्या झोपडीत असताना सापाने त्याला चावले. त्यावेळी तेथे उपस्थित वामन कोडके व बाळू कोळपे…

Read Full News

मग समोर कुणालाही येवू द्या, दिलीप खोडपेंच्या भूमिकेवर मंत्री महाजन यांची प्रतिक्रिया

हॅलो जनता, जळगाव – गणपती बाप्पाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे त्याला काय करायचे हे माहीत आहे. म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचेच सरकार मोठ्या मताधिक्याने येणार असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव शहरातील गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत म्हटले आहे. भाजपचे ३५ वर्षापासून निष्ठावान समर्थक दिलीप खोडपे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश…

Read Full News

विद्यमान आमदारांनी मतदारसंघ भकास करण्याचे पाप केले आहे, सेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांची टीका…

हॅलो जनता, प्रतिनिधी – केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांची मोठी उपेक्षा केली असून त्यांच्या प्रश्नांवर विचार करण्यासाठी कुणालाही वेळ नसल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. सरकार फक्त प्रचारात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. अशी टीका शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी केली आहे. पाचोरा भडगाव मतदारसंघातील जारगाव येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात त्या बोलत होत्या….

Read Full News

बिबट्याच्या हल्ल्यात मयत रिंकेश मोरे च्या कुटुंबियांना आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते १० लाखांची मदत…

हॅलो जनता, चाळीसगाव – गणेशपूर येथील रिंकेश नंदू मोरे या १३ वर्षीय तरुणाचा बिबट्याचा हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेची दखल घेत आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या तसेच मयताच्या कुटुंबियांना तात्काळ अर्थसहाय्य देण्याच्या सूचना वनविभागाला दिल्या होत्या. त्यानुसार मयत रिंकेश मोरे च्या कायदेशीर वारसांना एकूण २५ लाखांची…

Read Full News

274 सुशिक्षित युवकांना मिळाला आधार, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र वाटप…

हॅलो जनता, जळगाव – युवकांच्या हाताला काम देऊन त्याला प्रशिक्षित करून नवा आत्मविश्वास पेरण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ उपयुक्त ठरणार आहे. युवकांना या प्रशिक्षण काळात मिळणारा अनुभव हा त्यांना अधिक कार्यक्षम बनविण्यास मदत करणारा ठरेल असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. धरणगाव येथे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांच्या सहकार्याने…

Read Full News

आमदार किशोर पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट, सागर बंगल्यावर मिळाला गणपती बाप्पाच्या आरती मान

हॅलो जनता, जळगाव – पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी भाजपचे वरिष्ठ नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या मुंबई येथील सागर निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सागर बंगल्यावर स्थापना केलेल्या गणपती बाप्पाच्या आरतीचा मान आमदार किशोर पाटील यांना मिळाला. तसेच पाचोरा भडगाव मतदार संघातील विविध मुद्द्यांवर आमदार किशोर पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी…

Read Full News

सेवानिवृत्त चालक अमृत पाटील यांचा स्त्युत उपक्रम, गावातील स्मशानभूमीत केले वृक्षारोपण

हॅलो जनता, प्रतिनिधी – एस टी महामंडळाच्या पाचोरा आगाराचे सेवानिवृत्त चालक श्री अमृत दोधू पाटील उर्फ (बाळू अण्णा) यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्ताने पाचोरा तालुक्यातील जळगाव या त्यांच्या मूळ गावी स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण केले आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, एसटी महामंडळाच्या पाचोरा आकाराचे सेवानिवृत्त चालक अमृत पाटील हे…

Read Full News

चोपडा : १२ वर्षीय मुलीवर शेतात अत्याचार करत दगडाने ठेचून खून, संतापजनक प्रकाराने खळबळ

हॅलो जनता, प्रतिनिधी – राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना चोपडा तालुक्यात शनिवारी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. विरवाडे-मालापूर रस्त्यावर एका बारा वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. तिच्या लहान बहिणीने हा प्रकार गावकऱ्यांना सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. शेतातील निंदणीचे काम आटोपून मालापूर…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION