कजगावात गणरायाला निरोप ; विसर्जन मिरवणूक शांततेत संपन्न.
हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव कजगांव : येथील गणेशोत्सवाची सांगता गणपती विसर्जन मिरवणुकीने भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाली. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’च्या जयघोषात भाविकांनी गणरायाला निरोप दिला. गणरायाच्या विसर्जनासाठी कजगावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिला, युवक, बालकांसह ग्रामस्थांनी मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. आकर्षक पद्धतीने सजविलेल्या वाहनातून गणरायाची मिरवणूक…
