हॅलो राजकारण

Eknath Khadse : एकनाथ खडसे रक्षा खडसेंच्या प्रचारात सक्रिय, वरिष्ठांकडून प्रवेशाची तारीख निश्चित

हॅलो जनता (जळगाव) – भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेले आमदार एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांनी वरिष्ठांचे सूचनेनुसार रावेर लोकसभेच्या भाजपा महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांचे प्रचारास सुरुवात केली आहे. यावल येथील भाजपा प्रचार कार्यालयास भेट देत कार्यकर्त्यांना सूचना देत आढावा घेतला. भाजपामध्ये प्रवेश करीत असल्याचे आमदार एकनाथ खडसे यांनी जाहीर केल्यानंतर अद्याप पावतो प्रचारात सक्रिय झाले नव्हते.

मात्र दोन दिवसापासून प्रचारात सक्रिय झाले असून वरिष्ठांकडे माझ्या भाजप प्रवेशाबाबत मी सूचित केले होते त्यानुसार भाजपाचे वरिष्ठ नेते विनोद तावडे तसेच भाजपाचे प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना माझा प्रवेश कधी जाहीर करणार असे त्यांना विचारले असता त्यांनी प्रवेशाची तारीख कळवणार असल्याचे सांगून तुमचा प्रवेश झालेलाच आहे बैठका घेण्यास व प्रवास करण्यास हरकत नसल्याचे सांगितले त्यानुसार मी गेल्या दोन दिवसापासून प्रचारात सक्रिय झालो असून यावल हे माझे प्रचारार्थ आठवे गाव असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Eknath Khadse : रक्षाताई खडसे प्रचंड बहुमताने निवडून येतील

आगामी निवडणुकीत रावेर लोकसभा निवडणूक मतदार संघ अंतर्गत भाजपा उमेदवारास किती लीड मिळेल यापेक्षा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे मतदारांचे मतदानाचे प्रमाण यावर लीड अवलंबून असेल तरीही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वरील विश्वास व कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता रक्षाताई खडसे प्रचंड बहुमताने निवडून येतील असं देखील यावेळी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी सांगितले.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Jalgaon Accident: महामार्गावर अपघात, भाजप पदाधिकाऱ्याने वाचविले अपघातग्रस्तांचे प्राण

Jalgaon Loksabha : जय मल्हार क्रांती संघटनेचा महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांना जाहीर पाठींबा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button