हॅलो सामाजिक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाचोरा-भडगाव विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी हर्षल पाटील यांची नियुक्ती.

हॅलो जनता प्रतिनिधी : भडगाव 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला बळकटी देण्याच्या उद्देशाने पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्र प्रमुखपदी भडगाव तालुक्यातील कनाशी येथील युवा नेतृत्व हर्षल संजय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ. सतिश पाटील, जिल्हाध्यक्ष संजय पवार तसेच जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले यांच्या मान्यतेने करण्यात आली.

हर्षल पाटील यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भडगाव तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. त्यांच्या संघटन कौशल्याची दखल घेत पक्षाने पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातील पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

नियुक्तीप्रसंगी सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी, महिला कार्याध्यक्षा लता राठोड, उत्तर महाराष्ट्र युवती प्रमुख अभिलाषा रोकडे, युवती जिल्हाध्यक्षा मोनिका पवार, चाळीसगाव तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, शहराध्यक्ष कुशल देशमुख, विद्यार्थी कार्याध्यक्ष अजहर शेख, सागर घुगे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हर्षल संजय पाटील यांच्या नियुक्तीमुळे पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button