Headlines

🔴 ब्रेकिंग : नशिराबाद ग्रामस्थांचा स्मार्ट मीटरला तिव्र विरोध; आंदोलनाचा इशारा

हॅलो जनता न्यूज, जळगाव : नशिराबाद गावात विज वितरण महामंडळामार्फत घराघरांत स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र या निर्णयाला ग्रामस्थांकडून तीव्र विरोध होत असून, माजी सरपंच पंकज शामकांत महाजन यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे हा ठाम विरोध नोंदविला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, शासनाकडून स्मार्ट मीटर सक्तीने बसविण्याबाबत कोणताही स्पष्ट आदेश किंवा निर्णय प्रसारित झालेला…

Read Full News

🔴 ब्रेकिंग : गिरणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ, सतर्कतेचा इशारा…

हॅलो जनता न्यूज, चाळीसगाव – पाटबंधारे उपविभाग चाळीसगाव अंतर्गत असलेल्या गिरणा मोठ्या प्रकल्पातील पाण्याची आवक वाढल्यामुळे प्रकल्पाचा पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. तसेच नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज मध्यरात्री 4.00 वाजता धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गिरणा प्रकल्पाचा पाण्याचा विसर्ग 7428 क्युसेक्स वरून वाढवून…

Read Full News

🚨 पाचोरा तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

हॅलो जनता न्यूज, पाचोरा/भडगाव : पाचोरा व भडगाव तालुक्यात आज पुन्हा रात्रीच्या दहाच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, नागरिक व शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे तालुक्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर शेती, घरे व जनावरांचे नुकसान झाले होते. त्यात भर म्हणून आज पुन्हा सुरू झालेल्या पावसाने हाहाकार उडाला…

Read Full News

🛑पाचोरा : नुकत्याच लोकार्पण झालेल्या उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय पाण्यात, कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह..

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – शहरात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नव्याने लोकार्पण झालेले उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय पाण्याखाली गेले. काही दिवसांपूर्वीच या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, मुसळधार पावसात कार्यालय परिसराची विदारक परिस्थिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच या कार्यालयाचे भव्य लोकार्पण करण्यात आले असून या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधींसह पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती….

Read Full News

🚨 ब्रेकिंग : पाचोरा ढगफुटी, शेत पाहायला गेलेल्या शेतकऱ्याचा नाल्यात वाहून मृत्यू

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (जि. जळगाव) : गेल्या आठवडाभरापासून जळगाव जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. पाचोरा, जामनेर आणि मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांचे पिके, जनावरे तसेच घरांचे मोठे नुकसान झाले असताना रविवारी मध्यरात्री व सोमवारी सकाळी पाचोऱ्यात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळला. या अवकाळी पावसामुळे नदी-नाल्यांना अचानक पूर आला असून शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान, पाचोरा…

Read Full News

🛑 भडगावात पूरस्थितीचे सावट; प्रशासनाकडून ‘रेड अलर्ट’ जारी

हॅलो जनता न्यूज, भडगाव – तालुक्यात रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, प्रशासनाने ‘रेड अलर्ट’ जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. शहरातून वाहणारा कोल्हा नाला धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने आसपासच्या सखल भागात पाणी साचले आहे. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. रात्रभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील लहान-मोठे नदी-नाले पूर्ण…

Read Full News
पाचोरा तालुक्याला अतिवृष्टीचा फटका

🛑 पाचोरा तालुक्याला पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा, गावांमध्ये पाणी शिरल्याने संपर्क तुटला.

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (नितीन गोसावी) – तालुक्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. तालुक्यातील गाळण, बाळद, विठ्ठलनगरसह इतर गावांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी वर्ग पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. मुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, उडीद, मका यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली…

Read Full News

🛑 भुसावळ : नात्याला काळीमा फासणारी घटना, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार…

हॅलो जनता न्यूज, भुसावळ – नाशिक येथील एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच मावशीच्या पतीने, म्हणजेच तिच्या काकाने, लैंगिक अत्याचार केल्याची एक धक्कादायक घटना भुसावळ शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडित मुलगी नाशिक येथे शिक्षण घेत असून, तिच्या आई-वडिलांमधील कौटुंबिक…

Read Full News

🚨 सावदा शहरात जोरदार पाऊस; बाजारपेठेत पाणी साचल्याने नागरिक हैराण

हॅलो जनता न्यूज, सावदा (ता. रावेर) : रविवारी संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे सावदा शहरात पाणी साचून नागरिकांचे मोठे हाल झाले. विशेषतः रविवार पेठ व मुख्य बाजारपेठ परिसरात नाल्याचे पाणी शिरल्याने रस्ते व घरांसमोर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. यामुळे नागरिकांना वाहतुकीसह दैनंदिन व्यवहारांमध्ये प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागले. सावदा नगरपालिका : दरवर्षी पाणी साचत असल्याने नागरिक…

Read Full News

💊 फार्मसी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरील राष्ट्रीय परिषद उत्साहात संपन्न

हॅलो जनता न्यूज, चोपडा : फार्मसी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान, संशोधन आणि नव्या संधींवर प्रकाशझोत टाकणारी “फार्मसी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता” या विषयावरील राष्ट्रीय परिषद श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, चोपडा येथे मोठ्या उत्साहात पार पडली. महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित या महाविद्यालयाच्या व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने परिषदेचे आयोजन…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION