Headlines

🛑 जळगाव शेतकरी आंदोलन : ११ शेतकऱ्यांसह बच्चू कडू, उन्मेष पाटील यांच्यावर गुन्हा

हॅलो जनता न्यूज, जळगाव, दि. १७ सप्टेंबर – केळी व कापसाला योग्य भाव मिळावा तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात जबरदस्ती प्रवेश करत आंदोलन केल्याप्रकरणी माजी मंत्री बच्चू कडू आणि माजी आमदार उन्मेष पाटील यांच्यासह ११ जणांवर जिल्हा पेठ पोलिस…

Read Full News

विद्यापीठात व्यवस्थापन अध्ययन प्रशाळेतर्फे युवक जनजागृती शिबिराचे आयोजन…

हॅलो जनता न्यूज, जळगाव प्रतिनिधी – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन अध्ययन प्रशाळेतर्फे युवक जनजागृती शिबिराचे आज दि. १८ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले. आयोजित शिबिरात विविध मान्यवर प्राध्यापकांनी युवकांना आरोग्य, नातेसंबंध, समाजभान आणि जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केले. शिबिराची सुरुवात डॉ. शमा सराफ यांच्या “युवक जनजागृती” या विषयावरील सत्राने झाली. त्यांनी आजच्या युवकांनी…

Read Full News

🛑चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीची ऐतिहासिक कामगिरी, जळगाव जिल्ह्यात प्रथम…

हॅलो जनता न्यूज, चोपडा (जि. जळगाव) : चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीने सन २०२४-२५ या वर्षात उत्कृष्ट कामगिरी करत ऐतिहासिक यशाची नोंद केली आहे. महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, पुणे यांच्या वतीने दिला जाणारा कै. वसंतरावदादा पाटील स्मृती पुरस्कार – २०२५ मध्ये चोपडा बाजार समितीने नाशिक विभागातून द्वितीय क्रमांक पटकावला. पुणे येथील विणकर…

Read Full News

🛑धक्कादायक : पाचोरा शहराच्या मुख्य स्मशानभूमीत धक्कादायक प्रकार, नातेवाईकांनी चारचाकी वाहनाचे लाईट लावून केला अंत्यसंस्कार…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा : शहराच्या मुख्य स्मशानभूमीत मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा उघड झाले आहे. रात्री अंत्यविधीसाठी आलेल्या नातेवाईकांना अंधारातच अंत्यसंस्कार करावे लागले. वीजपुरवठा आणि लाईटची कोणतीही सोय नसल्याने चारचाकी गाडीचे हेडलाईट लावून मृतदेहावर अंत्यविधी पार पाडावा लागला. या प्रसंगामुळे नातेवाईकांसह नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागले. पाचोरा नगरपालिकेचा भोंगळ कारभार…

Read Full News

🛑 ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात ३२ जलस्रोत जैविकदृष्ट्या बाधित

हॅलो जनता न्यूज, जळगाव : जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशी पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी आरोग्य विभागामार्फत ऑगस्ट २०२५ मध्ये करण्यात आली. या तपासणीत जिल्ह्यातील एकूण १७५५ जलस्रोतांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ३२ जलस्रोत जैविकदृष्ट्या बाधित आढळून आले आहेत. दरम्यान, ही तपासणी आरोग्य विभागाकडून नियमितपणे केली जाते. बाधित स्त्रोतांवर तात्काळ उपाययोजना करण्यात आली असून, ग्रामपंचायतमार्फत…

Read Full News

🛑 ब्रेकिंग : जळगावात मनसे आक्रमक, दहा दिवसांत तोडगा अन्यथा…

हॅलो जनता न्यूज, जळगाव : शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) समोर उभारण्यात आलेल्या कचरा संकलन केंद्रामुळे परिसरात असह्य दुर्गंधी पसरून विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने आज विद्यार्थ्यांना घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात आले. विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी होत मनपाच्या निष्काळजीपणाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला. मनसे…

Read Full News
🛑 ब्रेकिंग : जळगावात शेतकरी आक्रमक; गेट तोडून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश...

🛑 ब्रेकिंग : जळगावात शेतकरी आक्रमक; गेट तोडून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश…

हॅलो जनता न्यूज, जळगाव : केळी व कापसाला योग्य भाव मिळावा, शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या तात्काळ मान्य व्हाव्यात यासाठी आज दिनांक १७ सप्टेंबर रोजी जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदान येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य शेतकरी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व शेतकरी नेते व बहुजन विकास आघाडीचे आमदार बच्चू कडू यांनी केले. मोर्चाच्या वेळी बच्चू…

Read Full News

🛑 बिग ब्रेकिंग : लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होणार, निवडणुका तीन टप्प्यांत?

हॅलो जनता न्यूज, मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोग तीन टप्प्यांत या निवडणुका घेण्याचा विचार करीत असून त्यानुसार प्राथमिक आराखडा तयार करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका, दुसऱ्या टप्प्यात नगरपालिका, तर तिसऱ्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात…

Read Full News

मंत्री गिरीश महाजन यांनी नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी, शेतकऱ्यांना म्हणाले…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – जिल्ह्यातील जामनेर, पाचोरा तालुक्यातील नेरी,चिंचखेडा गावात व परिसरात अतिवृष्टीमुळे घरे व शेत पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनातर्फे सर्वतोपरी मदत करण्यात येईल. असा विश्वास राज्याचे जलसंपदा ,आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिला. जामनेर तालुक्यातील नेरी गावातील भोरटक्के नगर, इंदिरानगर, बाजार पट्टा तर पाचोरा तालुक्यातील शिंदाड, सातगाव या गावातील  अतिवृष्टी झालेल्या भागाची…

Read Full News

🛑 केसीई सोसायटी ८१ वर्षात खान्देशात आपले शैक्षणिक क्षेत्रात निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले – कुलगुरू प्रा. माहेश्वरी

हॅलो जनता न्यूज, जळगाव – खान्देश कॉलेज एज्युकेशन (केसीई) सोसायटीने आपल्या गुणवत्ता आणि क्षमता यांचा आदर्श खान्देशातील सर्वसामान्य पिढीला देऊन शिक्षित ,सक्षम आणि आत्मनिर्भर केले. ८१ वर्षात खान्देशात आपले शैक्षणिक क्षेत्रात निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. विद्यार्थ्यांना झेन जी सारख्या नवनवीन संकल्पना अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शिकवणे आता काळाची गरज झाली आहे असे प्रतिपादन कबचौ उत्तर महाराष्ट्र…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION