उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांच्या कला पाहून दादा आणि भाऊ भारावले….
हॅलो जनता न्यूज, जळगाव, दि. २५ (प्रतिनिधी): जळगाव शहरातील सोशल मल्टीपर्पज फाऊंडेशन संचलित ‘उडान’ दिव्यांग प्रशिक्षण केंद्राला माजी मंत्री सुरेशदादा जैन आणि जैन इरिगेशन सिस्टिम्सचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी भेट दिली. या भेटीत त्यांनी दिव्यांग मुलांचा आत्मविश्वास वाढवण्याबरोबरच केंद्राला आर्थिक व सामाजिक पाठबळ देण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘उडान’च्या संचालिका हर्षाली चौधरी, समुपदेशक स्वाती ढाके…
